loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस! तब्येत खालावली .

करमाळा नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्णजयंती योजनेतून झालेल्या करमाळा शहरातील रस्ते कामात मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून रस्ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झालेले आहेत शासकीय निधी मध्ये झालेल्या या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या करीता भाजापा चे माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे यांनी उपोषण सुरु केली असुन उपोषणाचा आज तिसरा दिवस संपत आला तरी अजून देखील प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही.दरम्यान चंद्रकांत राखुंडे यांची प्रकृती खालावली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्णजयंती योजनेतून झालेल्या करमाळा शहरातील रस्ते कामात मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून रस्ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झालेले आहेत यासाठी शासकीय निधी मध्ये झालेल्या या भ्रष्टाचार याबाबत वारंवार नगर परिषद अधिकारी तहसिल आधिकारी जिल्हाधिकारी यांना वारंवार कळवुन सुद्धा या प्रकरणाची कसली चौकशी झालेले नाही कोणावरही कारवाई झालेली नाही या संदर्भामध्ये या पूर्वी श्री चंद्रकांत बबन राखुंडे भारतीय जनता पार्टी मा शहर अध्यक्ष करमाळा तहसील कार्यालयासमोर 25 10 2021 रोजी उपोषणास बसले होते तरीही प्रशासनाला कसल्याही प्रकारचा न्याय देता आलेला नाही

✍ चौफेर प्रतिनीधी

अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने झालेल्या करमाळा शहरातील रस्ते भ्रष्टाचाराची चौकशी होवून संबंधितावर कारवाई व्हावी व करमाळा शहरातील जनतेला न्याय मिळावा व आलेल्या शासकीय निधीचा गैरवापर होऊ नये आणि अन्याय करणारा वर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन संबंधित ठेकेदार हा ब्लॅक लिस्टमध्ये टाकावा व निकृष्ट झालेले रोड हे परत एकदा चांगल्या पद्धतीने करण्यात यावे यासाठी श्री चंद्रकांत बबन राखुंडे भारतीय जनता पार्टी मा शहर अध्यक्ष आमरण उपोषणाला बसले आहेत संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे व लवकरात न्याय देवा अशी मागणी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts