loader
Breaking News
Breaking News
Foto

बार्शीचे भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांच्या 'त्या वक्तव्याचा' करमाळ्यात निषेध ! पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयासमोरच प्रतिमेस जोड्याचा हार!

आजपर्यंत आनेक भल्याभल्या नेत्यांना जिभेवर ताबा न ठेवता आल्याने मोठी किंमत मोजावी लागली आहे ,एका चुकीच्या वक्तव्यांने काही राजकीय नेत्यांना तर संपूर्ण राजकीय बस्तान गुंडाळावे लागले आहे तर बर्‍याच जणांना जाहीर माफी मागावी लागली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

भावनेच्या भरात केलेल्या या एका चुकीच्या वक्तव्याची किंमत आमदार प्रशांत परिचारक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांना कळुन चुकली आहे .बार्शीचे भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांची यात नव्याने भर पडली असून अंपग बांधवा बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांने नवा वाद निर्माण झाला आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या या वक्तव्यावर आपंग बांधवांनी अक्षेप घेतला आमच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगीतले असून करमाळा तालुका प्रहार अंपग क्रांती आदोलन च्या वतीने आमदार राऊत यांच्या प्रतिमेस जोडे घालून निषेध व्यक्त केला असून दिव्यांग व्यक्तीसाठी केंद्र सरकारकडून पारित केलेल्या कायद्यानुसार एट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे या संबधीचे निवेदन तहसीलदार समीर माने व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना दिले असुन पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयासमोरच आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेस चपलेचे हार घालण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

हे निवेदन देण्यासाठी करमाळा तालुका प्रहार अपंग संघटनेच्यावतीने बबन आरणे,समिर बागवान, संतोष सोनके, मोहन माने, प्रवीण सरडे, किशोर ढाळे, योगेश चव्हाण, संतोष कुंभार, भाऊसाहेब झिंजाडे, राजेश मुथ्था, संदिप सावरे. उपस्थितीत होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts