loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाळी सुट्टीचा घोळ मिटला! सोलापूर जिल्ह्यातील शाळांना २० नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्टी - शिक्षणाधिकारी भास्कर बाबर

शाळांच्या दिवाळी निमित्त च्या सुट्याबाबत सुरु असलेला वादावर पडदा पडला असून मुख्याध्यापक संघाच्या मागणीनुसार झालेल्या चर्चेत माध्यमिक चे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी इतर जिल्ह्याप्रमाणे दिवाळीची सुट्टी २० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. या संबधीचे परिपत्रक त्यांनी जाहीर केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शाळांच्या दिवाळी सुट्याबाबत शिक्षण विभागाने वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्याने शिक्षक, विद्यार्थ्यी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. इतर जिल्ह्यातील शाळांची सुट्टी १९व२० नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली होती तर सोलापूर जिल्ह्यातील शाळा मात्र ११नोव्हेंबर पासुन सुरु करण्यात आल्या होत्या.

✍ चौफेर प्रतिनीधी

शासन परिपत्रका नुसार २८ ऑक्टोबर पासुन १० नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर केली होती मात्र १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संपदाणूक परिक्षा असल्याने ११ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिले होते ठरल्या प्रमाणे परिक्षा देखील पार पडली मात्र मुख्याध्यापक संघांने इतर जिल्ह्यातील सुट्याप्रमाणे आमच्या सुट्या देखील वाढवुन देण्याची मागणी केली होती.त्या मुळे दिवाळीच्या सुट्या वाढणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

बाबर यांनी हि मागणी मंजूर केली असून १५ नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा २० नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्टी वाढवुन देण्यात आली आहे.दिवाळी सुट्टी वाढवुन मिळाल्याने विद्यार्थ्यांना आणखी पाच दिवस दिवाळीचा आनंद घेता येणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts