loader
Breaking News
Breaking News
Foto

मकाईच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम संपन्न,पूर्ण ताकदीनिशी गाळप करणार असल्याचे अ‍ॅड. ज्ञानदेव देवकर यांचे प्रतिपादन

भिलारवाडी ता करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मोळीपुजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला असून ,पूर्ण ताकदीनिशी गाळप करणार असल्याचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. ज्ञानदेव देवकर यांनी सांगीतले.या वेळी अधीक बोलताना देवकर म्हणाले की यंदाचा ऊस गळीत हंगाम मोठा आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण जास्त आहे. मकाई यंदा पूर्ण क्षमतेने चालवून जास्तीत जास्त गाळप करणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले असुन ते म्हणाले की यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार आहोत. कारखान्याचे साडेतीन लाख ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याच्या असावणी प्रकल्पाच्या माध्यमातून ७५ लाख स्पीरीटचे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण जास्त असले तरी सभासदांचा ऊस मागे ठेवणार नाही इतर कारखान्यासोबतच मकाईची एफआरपी देऊ असे सांगीतले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे आणि संचालक संतोष देशमुख यांचे शुभहस्ते गव्हाण पूजन झाले. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. दिगंबररावजी बागल (मामा) यांचे पुतळ्याचे पूजन कारखान्याचे माजी संचालक मोहन गुळवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच सत्यनारायण पूजा संचालक दत्तात्रय गायकवाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, संचालक महादेव गुंजाळ, नंदकिशोर भोसले, गोकुळ नलवडे, संतोष देशमुख, बाळासाहेब सरडे, महादेव सरडे, सुनील शिंदे, रामचंद्र हाके, धर्मराज नाळे, नितीन राख, बापू कदम, रघुनाथ फरतडे, राणी लोखंडे, संतोष पाटील दत्तात्रय गायकवाड, कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे, सभासदांमध्ये अजित झांजुर्णे, प्रशांत दिवेकर, मोहन खाटमोडे, दादासाहेब डोंगरे, विष्णू जाधव, रेवन्नाथ निकत, गणेश झोळ, सुयोग झोळ, रणजित शिंदे, विलास काटे, बापूराव शिंदे, सोनाज काळे, अजिनाथ पांढरमिसे, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts