loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करमाळा शाखेचा एसटी कर्मचारी संपाला पाठिंबा

महाराष्ट्र राज्य एस टी कर्मचाऱ्यांकडून सुरु असलेल्या संपाला आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतिने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी आज बंद आहे. मागील काही वर्षापासून एस टी महामंडळाचे कर्मचारी एसटीला राज्य सरकार मध्ये सामावून घेण्याच्या व अशा विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहेत. या संदर्भात अनेक वेळी राज्यात आंदोलने देखील झाले आहेत आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन देखील राज्य शासनाकडून दिले गेले परंतु अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. गेल्या पाच दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे व त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूकी संदर्भात गैरसोय होत आहे. दिनांक 11 नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू झाले आहेत. विद्यार्थी बस पास काढून प्रवास करत,अनेक वाडी-वस्ती व गावात प्रवासासाठी दुसरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. योग्य त्या मागण्या मान्य होऊन लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी आज एस. टी. कर्मचारी यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

झोपलेल्या राज्य सरकारच्या विरोधात आज एस. टी.स्टँड करमाळा येथे जोरदार घोषणा देऊन शासनाचा निषेध करण्यात आला. शासन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा मंत्रिमंडळाचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहेत अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी अभाविप पुणे विभाग संयोजक सौरभ शिंगाडे,पंढरपूर जिल्हा संयोजक शुभम बंडगर,तालूका प्रमुख संतोष कांबळे, शहरमंत्री संकेत दयाळ,विश्वजित चिवटे,प्रसाद कोकीळ,विकास सरवदे , केवल दोशी,रोहीत थोरवे आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts