loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील एक्साईज कर कमी करावा -भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे तहसीलदार यांना निवेदन

राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील एक्साईज कर कमी करावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार समीर माने यांना भेटून निवेदन सादर केले आहे . निवेदनात भाजपाने म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

भाजपाशासित राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही, याची नोंद घ्यावी.राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोलवरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी असे म्हटले आहे, तसेच राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात.राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी.अशी मागणी करण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके ,दादा देवकर, विनोद महानवर, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष ऋषी फंड, दत्तात्रय गाडे, विशाल साळुंखे, भैया कुंभार, शरद कोकीळ, किरण शिंदे, बाळा जाधव उपस्थित होते,

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts