उमरड ते पोंधवडी या पाचशे लोकांची लोकवस्ती असलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी पोंधवडी येथील अनेक शेतकरी तहसील कचेरीसमोर उपोषणास बसले होते. उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून उपोषणकर्त्यांची दखल घेण्यात आली नव्हती किंवा त्यांची कुठलीही विचारपूस केली गेली नव्हती. त्या मुळे शेतकऱ्यांत नाराजी होती
शेतकऱ्यांनी करमाळा चौफेर कडे व्यथा मांडल्यांनतर "रस्ता दुरुस्ती साठी पोंधवडीकरांचे उपोषण! दोन दिवस उलटले ,ना फिरकले अधिकारी ना लोकप्रतिनिधी" या ठळक मथळ्याखाली करमाळा चौफेर ने वृत प्रसिद्ध करताच पंचायत समीतीचे सभापती अतुल पाटील जिल्हापरिषद सदस्या सविताराजे भोसले नायब तहसीलदार श्री जाधव साहेब जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता जगदीश पाटील यांनी तात्काळ उपोषण स्थळावर भेट दिली व ठाम आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेण्यात आलेचे सांगतीतले.तसेच करमाळा चौफेर च्या बातमी मुळे आमची दखल घेतल्याचे सांगत कौतुक केले आहे.
या वेळी सभापती अतुलभाऊ पाटिल व जिल्हापरिषद सदस्या सविताराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रोजगार हमी योजनेंतर्गत तसेच जिल्हा परिषद मार्फत उपअभियंता जगदीश पाटील यांचेकडून किमान पंधरा लाख निधी तरतूद करण्याचे पञ प्रस्तावित मागणी केले आहे.तसेच रस्ता अडवणूक अडचन ही तहसिलदार समिर माने साहेब,जाधव साहेब यांचे सोडवून प्रत्यक्ष पोलिस स्टेशन समजस्यांच्या तोडग्यातून मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले व सभापती अतुल पाटील यांच्या हस्ते उपोषण कर्त्यांना लिंबुपाणी देवून उपोषण स्थगित करण्यात आले.रस्ता दुरुस्त होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असल्याचा विश्वास सभापती अतुल पाटील व जिल्हापरिषद सदस्या सविताराजे भोसले यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.