loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्ता दुरुस्ती साठी पोंधवडीकरांचे उपोषण! दोन दिवस उलटले ,ना फिरकले अधिकारी ना लोकप्रतिनिधी

पोंधवडी ता करमाळा येथील पोंधवडी ते उमरड गावाला जोडणाऱ्या ग्रामीण मार्ग 272 या रस्त्यावर पावसाळ्यात होत असलेल्या चिखला मुळे जवळपास पाचशे नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या रस्त्यावर शासकीय निधीतून खडीकरण व मुरुमीकरण करावे या मागणीसाठी पोंधवडी येथील अनेकजण जण तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले असून दोन दिवस उलटले तरी एकही प्रमुख अधिकारी अथवा लोकप्रतिनिधीं उपोषणस्थळावर आले नसल्याने आंदोलनास बसलेल्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सध्या या रस्त्यावरुन मोटार सायकल चारचाकी येणे तर दुरच असून नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. दुध वाहतूक करणारी गाडी या रस्त्यावरुन येत नसल्याने गुडघाभर चिखलातुन वाट काढत नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. चारा आणणे ,शेतीसाठी खते आणणे यासारखी कामे ठप्प झाली आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या रस्त्याच्या दुरुस्ती साठी नागरिक उपोषण बसले आहेत यांचा प्रश्न सुटणे तर लांबच आहे मात्र दोनदिवसांपासुन उपोषणास बसून देखील एकाही लोकप्रतिनिधींकडून साधी विचारपूस देखील झाली नसल्याने शेतकर्‍याकडून तिव्र संताप व्यक्त होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts