loader
Breaking News
Breaking News
Foto

केम येथील अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा तिव्र आंदोलन करु, शिवसेना महिला आघाडीचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना निवेदन

करमाळा तालुक्यातील केम सारख्या शांतता प्रिय गावातील खुले आम सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत असी मागणी करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वर्षाताई चव्हाण यांनी महिला शिष्टमंडळच्या वतीने करमाळा तालुक्याचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक कोकणे साहेब याना समक्ष लेखी निवेदन देऊन केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या निवेदनात म्हटले आहे कि करमाळा तालुक्यातील सर्वात मोठया समजल्या जाणाऱ्या केम गावात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत मात्र पोलीस बध्याची भूमीका घेत याला पोलीसाचा आशीर्वाद आहे का? अवैध धंदयामध्ये बेकायदेशीर दारू मटका जुगार, सावकारी असे धंदे खुलेआम सुरू आहेत या मुळे गरिबांचे संसार ऊधवस्त होत आहे तरूण वर्ग मटक्याच्या आहारी गेला आहे केम गावात मोठया प्रमाणावर मटका सुरू आहे गावात दहा ते पंधरा एजंट आहेत चौका,चौकात टपऱ्या मध्ये हा व्यवसाय सुरू आहे तरी माननीय कोकणे साहेब यानी लक्ष घालून हे धंदे बंद करावेत अन्यथा शिवसेना महिला महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा ईशारा देण्यात आला आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी (केम)

तसेच केम पोलीस चौकिसाठी पूर्वीचे देवकर साहेब यांच्या कडे केमचा चार्ज देण्यात यावा असी मागणी केली आहे देवकर साहेब यानी केम येथे चांगलाच धाक बसविला होता त्याना केम येथील खडाना खडा माहिती आहे आता सध्या पोलीसाचा धाक राहिला नाहि त्यांची बदली झाल्यापासून खुले आम धंदे सुरू आहेत तरी योगय ती कारवाई करावी हे निवेदन देताना शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वर्षाताई चव्हाण ,शहरप्रमुख आशा मोरे,मंजुळा पळसकर, दुर्गळे मॅडम उपस्थित होत्या शिवसेना महिला आघाडी ने हा प्रश्न हाती घेतल्याने त्यांचे महिलानी कौतुक केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts