loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्रातील सहा जागासांसाठी विधान परिषद निवडणुक जाहीर सोलापूर बाबत मात्र हा निर्णय!

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान आणि 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

विधान परिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्ठात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे. 

✍ चौफेर प्रतिनीधी

सोलापुरचे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे. त्यापूर्वीच विधान परिषदेची निवडणूक घेण्यात येणार असल्याची शक्यता होती ती खरी ठरली असून राज्यातील सोलापूर व अहमदनगर वगळून सहा ठिकाणी विधान परिषद निवडणुक जाहीर झाली आहे. सोलापूर मधुन प्रशांत परिचारक हे भाजप पुरस्कृत विधान परिषद सदस्य असून त्यांची डिसेंबर मध्ये मुदत संपत आहे. या ठिकाणी भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी कडुन शिवसेनेचे दिलीप माने असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे मात्र ऐनवेळेस काँग्रेस व राष्ट्रवादी काय भुमीका घेते या वर सर्व अवलंबून आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

16 नोव्हेंबरअर्ज दाखल करण्याचा दिनाक : 23 नोव्हेंबरअर्जांची छाननी: 24 नोव्हेंबरअर्ज मागे घेण्याची मुदत मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4) मतमोजणी : 14 डिसेंबरनिवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक: 16 नोव्हेंबर असा निवडणुक कार्यक्रम पार पडणार आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts