loader
Breaking News
Breaking News
Foto

आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत: आंदोलनात उतरेन - भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचा इशारा!

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे, पगारवाढ, त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधीक बोलताना गणेश चिवटे म्हणाले की गेली 15 दिवस झाले सरकार गांजा आणि चरसच्या मागे लागले आहे. मात्र एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देयला त्यांना वेळ भेटत नाही ही शोकांतिका असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सरकार व महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर दबाव येत आहे कारवाई ची भाषा होत आहे हे दुर्दैव असुन आंदोलन करणाऱ्या एका जरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत: आंदोलनात उतरेण असा इशाराच भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिला आहे तसेच राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करावं, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केलीय

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी आगार प्रमुख अश्विनी किरगत यांच्या भेट घेऊन आंदोलन करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची मागणी केली . आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल एस टी कर्मचाऱ्यांकडून भाजपा चे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे आभार मानले.तसेच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवण्याची मागणी केली.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts