loader
Breaking News
Breaking News
Foto

एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास करमाळा तालुका भाजपा चा जाहीर पाठिंबा.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरू आहे. या संपाची अनेक कारणे आहेत, कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनास भाजपा करमाळा तालुक्याच्या वतीने ता.सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी आगार व्यवस्थापक अश्विनी किर्गत यांना भेटून चर्चा केली, त्यांनी सहकार्याची भूमिका दाखविली आहे व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी बोलताना श्री साळुंके म्हणाले की, एस.टी.महामंडळ हे राज्य सरकारकडे सामायिक करून सरकारने चालवावे, एस.टी.च्या सतत होणाऱ्या तोट्यामुळे कर्मचारी बांधवांचे अतोनात नुकसान होत आहे. एस.टी. च्या कर्मचाऱ्यांना मिळणारे मासिक वेतन व भत्ते हे अत्यंत कमी आहेत, त्याच्यावर कुटुंबाचे पालन पोषण करणे खूपच कठीण आहे, वेतनवाढ ही होणे गरजेचे आहे, इतर विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनादेखील वेतन आयोग व ग्रेड पे मिळावा. त्याबरोबरच आगारच्या ठिकाणी पुरुष व स्त्री कर्मचारी यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या चांगल्या दर्जाच्या नसतात. यामुळे कर्मचाऱ्यांना कौटुंबिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यातून आत्महत्येसारखे टोकाची पावले उचलली गेल्याची अनेक उदाहरणे आपण आपल्या महाराष्ट्र राज्यात पाहत आहोत. कोरोनाच्या काळात देखील कर्मचारी बांधव कार्यरत होते, त्याचीही दखल या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतली पाहिजे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यासाठी भारतीय जनता पार्टी, करमाळा तालुका पूर्ण ताकतीने संबंध एस.टी. कर्मचारी बांधव व त्यांचे कुटुंबीय यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. सदरच्या निवेदनाच्या प्रती परिवहनमंत्री अनिल परब व विभागीय नियंत्रक,सोलापूर यांना दिल्या आहेत. याप्रसंगी भाजयुमो चे प्रदेश सचिव दीपक चव्हाण, शहर अध्यक्ष जगदिश आगरवाल, नरेंद्रसिंह ठाकूर, जितेश कटारिया, सचिन चव्हाण आदी पदाधिकारी यांच्यासह एस.टी. कर्मचारी बांधव उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts