loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐन दिवाळीत एस टी कामगार संपावर प्रवाशांचे प्रचंड हाल! मागण्या मान्य होईपर्यंत कर्मचारी संपावर ठाम

एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे आणि दरमहा अखंडितपणे वेतन मिळावे, यासाठी १ लाख कर्मचारी १ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन करेल असा इशारा दिला होता .टप्या टप्प्यात हे आंदोलन सुरु होतं आज संपूर्ण राज्यात उत्स्फूर्त पणे कामगार संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम झाल्याने एस टि मधील सर्वच राजकीय पक्षांच्या कामगार संघटनांना देखील पाठिंबा जाहीर करावा लागला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना, एसटी कर्मचारी कॉंग्रेस, एसटी कामगार सेना यांपैकी कोणत्याही संघटनेने अधिकृत जबाबदारी स्विकारली नाही मात्र राज्यातील सर्वच कामगार उत्स्फूर्त पणे सहभागी झाल्याने सरकार समोर संप मोडीत काढण्याचे आवाहन उभे झाले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या संपाची कुठलीही कल्पना नसल्याने नेहमीप्रमाणे प्रवासी बस स्थानकात दाखल झाले. पण बसेस बंद असल्याने प्रवाशी खोळंबल्याचं दिसून आलं.ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी एस. टी. हीच मुख्य सेवा असल्याने अनेक प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले दिवाळी साठी अनेक नागरिक आपल्या गावी येत असतात तर काही पाहुण्यांकडे जात असतात तसेच नवविवाहित मुली दिवाळी व बाहुबीजेसाठी माहेरी येत असतात या माहेरवाशीण मुली बस स्थानकावरच अडकून पडल्या आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान आगारा समोर एस टी कामगारांनी ठिय्या मांडला असून एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे ,राज्यसरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे अखंडीत वेतन मिळावे ,घरभाड्यात बोनस मध्ये वाढ व्हावी, आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई व एस टी मध्ये नोकरीची हमी द्यावी आशा मागण्या आंदोलना दरम्यान कामगारांनी केल्या असून जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता संपाचे आंदोलन सुरु रहाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts