loader
Breaking News
Breaking News
Foto

तडकाफडकी राजीनामा दिलेले शिवसेना जिल्हा उपप्रमुख भरत आवताडे यांचा उद्या आमदार शिंदे गटात प्रवेश !

शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीस कंटाळून शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलेले भरत आवताडे आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. उद्या रविवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता फिसरे येथे भव्य शेतकरी मेळावा होणार आहे या वेळी विकासकामांचे भूमिपूजन समारंभ व शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे व फिसरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप दौंडे , उपसरपंच संदीप नेटके , ग्रामपंचायत सदस्य विजय आवताडे , सदस्य हनुमंत रोकडे , सदस्य गणेश ढावरे यांचेसह विविध मान्यवरांचा आ. शिंदे यांच्या गटात प्रवेश होणार आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आवताडे यांनी राजीनामा सादर केल्यानंतर तरी शिवसेनेचे संपर्कप्रमुख जिल्हा समन्वयक , जिल्हाप्रमुख हे करमाळ्यातील गटबाजी व थांबवण्यासाठी लक्ष घालतील अशी शिवसैनिकांना आशा होती मात्र पक्षांतर्गत गटबाजी कडे जिल्हा पातळीवर पदाधिकाऱ्यांनी गांभिर्याने पाहिले नसलेचे चित्र दिसत आहे. पश्चिम भागातील देखील तालुका पातळीवर महत्त्वाच्या पदावर काम करणारा पदाधीकारी गटबाजीस कंटाळून राजीनामा देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे बागल व पाटील गटाबरोबर आमदार शिंदे यांनी शिवसेनेला सुद्धा मोठा हाबाडा दिला असल्याचे बोलले जात आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

झरे ,देवळाली नंतर आवताडे यांच्या माध्यमातून फिसरे या ठिकाणची ग्रामपंचायत ताब्यात आल्याने विट जिल्हापरिषद गटावर आमदार शिंदे यांची पकड मजबूत होताना दिसत आहे. एकीकडे शिंदे गट मजबूत होत असताना पाटील व बागल गटाकडून कोणतीही हालचाल होताना दिसुन येत नाही . पोफळज, कुंभेज या गावातील देखील पाटील बागल गटाचे महत्वाचे पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

फिसरे येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख यांच्या प्रवेशामुळे आ. शिंदे गटाला पूर्व भागात बळकटी मिळणार असून या कार्यक्रमाकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts