loader
Breaking News
Breaking News
Foto

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एनसीसीच्या वतीने जलप्रदूषण रॅलीचे आयोजन

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक, मेजर प्रशांत नायर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार "आजादी का अमृतमहोत्सव '' अंतर्गत "गंगा उत्सव '' साजरा करण्यात आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यानिमित्त 9 महाराष्ट्र बटालियन एनसीसी च्या जलप्रदूषण रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक, डॉ. लेफ्टनंट विजय गायकवाड, प्रा. संजय पाटील , प्रा.विलास मारकड, प्रा.पोपट कुदळे , श्री. चंद्रकांत पाटील , श्री. ज्ञानेश्वर कबाडे व श्री. शरद देवकर उपस्थित होते. सदर रॅली करमाळा शहरातून काढण्यात आली. एनसीसीच्या कॅडेट्सने घोषणा देऊन करमाळा शहर दणाणून सोडले .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या रॅलीच्या सांगता समारोप प्रसंगी जलप्रदूषण याविषयावर राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले स्वच्छतेला स्वतःपासून सुरुवात करावी. सध्या अनेक ठिकाणी नद्या तळी कालवे यामध्ये होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्या बद्दलची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक, डॉ. लेफ्टनंट विजया गायकवाड , प्रबंधक सौ, संगीता नाईक , सौ. अनिता साठे उपस्थित होते. यावेळी गृहणी दिनानिमित्त सौ. अनिता साठे यांनी अमूल्य मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक यांनी विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचे महत्व सांगितले व एनसीसी मधील शिस्ती बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लेफ्टनंट विजय गायकवाड यांनी केले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी CTO निलेश भुसारे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला एनसीसीचे कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts