loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योगा बरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब होसिंग- पत्रकार दिनेश मडके

बाळासाहेब होसिंग यांनी उद्योग व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळामध्ये कोविड सेंटर साठी मंगल कार्यालय उपलब्ध करुन देऊन नागरिकांची निस्वार्थ सेवा करण्याचे महान कार्य केले असून बाळासाहेबाचे हे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

बाळासाहेब होसिंग यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सत्कारप्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी कोरोना महामारीमध्ये कोरोना सेंटर सुरू करून करमाळा तालुक्यासह आसपासच्या परिसरातील नागरिकांना मदतीचा हात दिला असून वारे यांचा पुढाकार व होसिंग यांचे कार्यालय हा समन्वय पाहता खऱ्या अर्थाने दोघांचे आभार व्यक्त करावे तेवढे थोडेच आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना सदस्य नरेंद्रसिंह ठाकुर, भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश क्षीरसागर , ब्राम्हण युवा संघाचे चैतन्य पाटील, उद्योजक सुनील फुलारी, सोमनाथ विटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts