उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्याचा फक्त बोलबाला?आमदार संजयमामा शिंदे यांनी कुटिर रुग्णालयाबाबत केलेल्या दाव्याची राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून पोलखोल! .या मथळ्याखाली सा करमाळा चौफेर न्युज पोर्टल वर बातमी प्रसिद्ध होताच राष्ट्रवादीत खळबळ उडाली असून संबंधित पदाधिकाऱ्यांकडून सदरचे लेटरहेड वरील सह्या आमच्या नसून या लेटरहेड चा गैरवापर करून पत्रकारांनी भाकडकथा लिहली आहे असा त्रागा करत काल झालेल्या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या पदाधिकारी नलिनीताई जाधव यांच्या मुलिच्या डिलिव्हरी दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांकडुन मिळालेल्या उडवाउडवीच्या उत्तरा नंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाच अशी वागणूक मिळत असेल तर सर्व सामान्यांचे काय ?असा सवाल करत कुटिर रुग्णालयात मिळणाऱ्या सुविंधाचा फक्त बोलबाला आहे अशी टिका करत सिझेरियन विभाग, अंपग सर्टिफिकेट विभाग बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. व संबंधित निवेदन पदाधिकाऱ्यांच्या सह्या सह प्रसिद्धीस दिले होते तसेच संबंधित मंत्रालय पातळीवर तक्रारी चे इमेल देखील केले होते.एकीकडे आमदार संजय मामा शिंदे हे कुटिर रुग्णालयात डायलिसिस सह सिझेरियन विभाग ,अंपग सर्टिफिकेट विभाग सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचे सांगत असतानाच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कुटिर रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला गेला होता.या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप,महिला तालुकाध्यक्षा नलिनी जाधव,पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी दत्ता जाधव,राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव झांझुर्णे,उपाध्यक्ष अशपाक जमादार,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझाद शेख,राष्ट्रवादी चे युवक कार्यकर्ते मुस्तकीन शेख,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,सामाजिक न्याय शहराध्यक्ष ओंकार पलंगे,पदवीधर तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर राजश्री कांबळे आदींच्या सह्या होत्या या निवेदनाचा आधार घेऊन करमाळा चौफेर ने वृत्त प्रसिद्ध केले होते.मात्र या सह्या खोट्या असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
मात्र आज राष्ट्रावादी च्या पदाधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात आला असून त्यांनी म्हटले आहे की काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आशा लेटरहेडवर उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील आरोग्यविषयक रुग्णांच्या होणार्या गैरसोय बाबत अशा विषयावर एक पत्र काल सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत होतं. त्याखाली पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत ते पत्र काही कोणाच्या वैयक्तिक लेटरहेडवर नसून पक्षाचं लेटरहेड तयार करून लिहिलं गेलेलं आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी असून करमाळा तालुक्याचे आमदार माननीय संजयमामा शिंदे हे राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य आहेत काही पत्रकारांनी या तथाकथित लेटर पॅडचा आधार घेऊन संजयमामा शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आशा भाकड कथा मांडल्या. वास्तविक पाहता संजयमामा शिंदे हे आमदार झाल्या पासून किंवा त्याच्या आधी ही जिल्हा परिषद चे अध्यक्ष असताना करमाळा तालुक्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे काम करत आहेत. जे प्रकल्प गेले पंचवीस ते तीस वर्ष करमाळा तालुक्यात रखडलेले होते असे प्रकल्प मामांनी मार्गी लावलेले आहेत मग ते दहिगाव च्या बाबतीत असेल किंवा मांगी एमआयडीसी,टेभुर्णी-जातेगाव रस्साचे काम असेल. तसेच प्रत्येक गावातून आलेल्या कामांना मंजुरी देण्याचे किंवा ते प्रगतीपथावर ठेवण्याचं काम सध्या संजयमामा शिंदे उत्तम रित्या करत आहेत. आम्ही गेले सात ते आठ वर्षापासुन आमदार संजयमामा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत असताना अशा प्रकारे निवेदन,तक्रार व बातम्या आम्ही सोशल मीडियावर कशाला देऊ. जर आम्हाला काही त्रास होत असेल किंवा काममध्ये काही अडचण वाटत असेल तर आम्ही डायरेक्ट संजयमामांशी संपर्क करू शकतो आणि त्यांच्याकडून आमचे काम मार्गी लागतील.काल जे पत्र फिरलं त्या पत्रांमध्ये आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय संजयमामा शिंदे जी विकास कामे करमाळा तालुक्यामध्ये करत आहेत त्यामध्ये बाधा घालण्याचं काम अशा प्रवृत्तीची माणसे करत आहेत. आरोग्य विषयी बोलायचं झालं तर आमदार झाल्यापासून संजयमामांनी करमाळा तालुक्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा पुरवण्याचं काम केलेलं आहे. आत्ताच मामांनी डायलिसिस सुद्धा मंजूर करून आणलेली आहे. त्याची सुविधाही लवकरच करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे जनतेला मिळणार आहे. विरोधकांना मामांनी केलेला विकासकामे बघवत नाही म्हणून अशा पद्धतीचे खोटे आरोप आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करण्याचं काम करताहेत. संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे सिझेरियन ऑपरेशन, ऑक्सीजन प्लांट, डिजिटल एक्स-रे सुविधा, नियमित व पुरेसा औषध पुरवठा आणि मनोवृत्तीत मामांनी मंजूर करून घेतलेली डायलिसीस सुविधा चालू होणार आहे. या सर्व सुविधा लवकरच करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे जनतेला मिळणार आहे. आणि असे असताना आम्ही आरोग्यविषयक विषय घेऊन संजय मामा यांच्या विरोधात पत्रक कसे काढू शकू ही हास्यास्पद गोष्ट आहे. विरोधकांना मामांनी केलेला विकास बघवत नाही म्हणून अशा पद्धतीचे खोटे आरोप आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करण्याचं काम करताहेत. या तथाकथित पत्राचा आणि आणि आमचा म्हणजेच शिवराज जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा, दत्ता जाधव पंचायत समिती सदस्य, गौरव झांजुर्णे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आशपाक जमादार जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काॅग्रेस, रविंद्र वळेकर तालुका अध्यक्ष पदवीधर मतदार संघ आझाद शेख शहर उपाध्यक्ष, मुस्तकींन पठाण सामाजिक कार्यकर्ते आमचा काहीही संबंध नाही. त्याला आम्ही जबाबदार नाही.तरी या विषयांचा राजकारणासाठी व प्रसिद्धीसाठी खटाटोप करु नये असे सर्वांनी शेवटी सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.