करमाळा माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार संजयमामा शिंदे यांनी नुकतीच करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे व आजपर्यंत केलेल्या आपण केलेल्या पाठपुराव्या मुळे मोफत सिजरियन सुविधा, डिजिटल एक्स-रे मशीन , 30 बेडची सेंट्रल ऑक्सीजन लाईन ,ऑक्सीजन प्लांट, 50 कॉटचे श्रेणी वर्धन करून 100 कॉट मध्ये रूपांतर आदी सुविधा यापूर्वी झालेल्या आहेत असा दावा केला आहे.आमदार संजयमामा शिंदे यांनी कुटिर रुग्णालयातील सुविधा बाबत केलेल्या या दाव्याची मात्र राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून पोलखोल केली गेल्याने आमदार शिंदे यांची गोची झाली आहे.
उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्याचा फक्त बोलबाला असल्याची टिका राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप,महिला तालुकाध्यक्षा नलिनी जाधव,पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी दत्ता जाधव,राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव झांझुर्णे,उपाध्यक्ष अशपाक जमादार,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझाद शेख,राष्ट्रवादी चे युवक कार्यकर्ते मुस्तकीन शेख,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,सामाजिक न्याय शहराध्यक्ष ओंकार पलंगे,पदवीधर तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर राजश्री कांबळे आदींनी कुटिर रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊन तक्रार केली असून यात म्हटले आहे की,उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असलयाचा बोलबाला आहे तरीही रुग्णांना खासगी रुग्णालयात जाणीवपूर्वक पाठवण्यात येत आहे. या रुग्णालयातील जबाबदार डॉक्टर आणि अधिकारी यांचे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची आर्थिक लागेबंद असल्याचे निदर्शनास येते.याबाबतचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा मा. सौ. नलिनी ताई जाधव यांच्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळी मिळालेल्या उडवाउडवीच्या उत्तरांनी आला आहे.पदाधिकारी यांची ही अवस्था असेल तर सामान्य लोकांना वाली कोण? असे अनुभव पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला भरपूर प्रमाणात आलेला आहे आणि यात जर कोणाची जीवित हानी झाली तर त्यास जबाबदार कोण? अशी भावना सर्वसामान्य जनतेची झालेली आहे.असे म्हटले आहे तसेच सदर रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी तसेच डॉक्टर यांची आमच्या समक्ष सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर रुग्णांच्या जीविताशी खेळल्याबद्दल कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयाकडे केली आहे .तसेच करमाळा रुग्णालयात भोंगळ कारभार चालू असुन सिझेरियन विभागात भुलतज्ञ नसल्याच्या बहाण्याने जवळपास बंद आहे,अपंग सर्टिफिकेटसाठी आजही लोकांना सोलापूरला हेलपाटे मारावे लागत आहेत.कोरोना काळात खाजगी डॉक्टरांनी रुग्णाकडून मोठ्या प्रमाणात बिलाची वसुली केली आहे असे आरोप राष्ट्रवादीचे नितीन झिंजाडे यांनी केले आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.