loader
Breaking News
Breaking News
Foto

स्व नामदेवराव जगताप साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण झाले त्याच दिवशी आपले सरवार्थ राजकीय हेतु फिटले -चिंतामणी जगताप

ज्या दिवशी साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण झाले त्याच दिवशी आपले सरवार्थ राजकीय हेतु फिटले आसे भावनिक वक्तव्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप यांनी केले आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

माजी आमदार जयवंतराव जगताप गटाकडून युवा नेते यानी चिंतामणी जगताप यांच्या विरूद्ध दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी होवून चिंतामणी जगताप यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आज आदेश जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी जारी केला आहे याच पार्श्वभूमीवर चिंतामणी जगताप बोलत होते .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या बाबत अधीक बोलताना चिंतामणी जगताप म्हणाले की करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे स्व नामदेवराव जगताप यांचा पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून अनावरण न केल्याने दुर्लक्षित होता.हे दु:ख संपूर्ण तालुक्यातील स्व नामदेवराव जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बोचत होते.मी उपसभापती झाल्यानंतर सर्वांच्या भावनेचा आदर करून सर्वप्रथम साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करून सुशोभीकरण केले त्यामुळेच माझे बाजार समितीतील राजकीय कारकीर्द सफल झाली आहे.त्याबरोबरच सचिव शिंदे व इतर कर्मचारी यांनी बनवट दस्त तयार करून हे प्रकरण दाखल केले आहे असा आरोप चिंतामणी जगताप यानी केला असून 1999 साली अंङरटेबल पैसे घेवुन मला अधीग्रहीत झालेला प्लाॅट दिल्या बदल फसवणूकीचा फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा देखील इशारा दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आदिनाथ चे संचालक पद रद्द होवुन जर कोणी त्याच संस्थेचे पुढील काळात चेअरमन होत असेल तर ! मीही आशावादी आहे असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला आहे व आम्ही राजकीय दबाव टाकायला कमी पङलो असून ज्याईन्ट रजिस्टर पुणे यांच्या कङे दाद मागणार आहोत असे देखील चिंतामणी जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts