नगरपालिका व जिल्हापरिषद पंचायत समीती निवडणुका तोंडावर असतानाच तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली असून बाजार समितीत सत्ता खेचून आणलेल्या बागल गटाला जबरदस्त धक्का बसला असून जगताप गट मात्र पुन्हा फॉर्मात येत असल्याचे चित्र निर्माण झाले दरम्यान बागलांच्या भुमिकेकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
करमाळा कृषीउत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवण्यात बागल गटाला यश आले होते त्यावेळेस निर्माण झालेली सर्व राजकीय उलथापालथ आजुनही तालुक्याच्या चांगली लक्षात आहे.अनेक वर्षांपासून माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची असलेली मजबूत पकड ढिली करून बागल गटाकडून विजय मिळवला होता .त्या दिवशी पासून जगताप विरुद्ध बागल असा संघर्ष बाजार समितीत पहावयास मिळत आहे.एकमेकांवर कुरघोडी करण्याचा दोन्हीकडून सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत मात्र आज जयवंतराव जगताप गटाकडून बागल गटाला जोरदार झटका देण्यात आला आहे. युवा नेते शंभुराजे जगताप यांनी उपसभापती व दिग्विजय बागल यांचे कट्टर समर्थक चिंतामणी जगताप यांच्या विरोधात दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी झाली चिंतामणी जगताप यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.
सहकारी संस्थेचे सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यानी या संदर्भात आदेश दिले आहेत. या आदेशामुळे यामुळे बागल गटाला जबरदस्त धक्का बसला असून माजी आमदार जगताप गटात मात्र आनंदोत्सव होत आहे . चिंतामणी जगताप यांचेकडे करारान्वये बाजार समितीचा नोंदणीकृत भूखंड असून त्यांनी त्याचे भाडे देखील भरलेले नाही . सबब समितीशी प्रत्यक्ष संविदा /करार व थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र घोषित करून बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करणेबाबत जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी जिल्हा उपनिबंधक सह . संस्था सोलापूर यांचेकडे ॲड. कमलाकर वीर यांचेमार्फत अपील दाखल केले होते . या अपीलावर लेखी व तोंडी युक्तिवाद,सुनावणी होवून श्री .कुंदन भोळे जिल्हा उपनिबंधक सह .संस्था सोलापूर यांनी चिंतामणी जगताप यांना अपात्र घोषित करीत त्यांचे बाजार समिती सदस्यत्त्व रद्दबातल ठरविले आहे . आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेमधील योग्य असा राजकीय समन्वय हा देखील या घडामोडीत महत्वपूर्ण मानला जातआहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.