loader
Breaking News
Breaking News
Foto

मासेमारीसाठी गेलेला युवक दोनदिवसांपासुन होता गायब आज पाण्यावर तरंगताना आढळून आले प्रेत!

मासे धरून आणण्यासाठी जातोय असे आपल्या पत्नीस सांगुन गेलेला ३८ वर्षांचा युवक दोन दिवसांपासून गायब होता अखेर आज सकाळी साडे अकरा च्या सुमारास पाण्यावर प्रेत तरंगत असताना दिसल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.नागनाथ वसंत सुळ असे या मृतव्यक्ती चे नाव आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या युवकाच्या पत्नीने गावातील काही लोकांना सांगितल्याने गावातील पट्टीच्या पोहणार्‍या युवकांनी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र विस फूठ खोल पाणी असल्याने शोध घेता आला नव्हता.काहींना रागावून तो कुठे तरी गेला असेल आशी खात्री होती मात्र आज काहींना पाण्यावर तरंगत असलेले प्रेत दिसल्याने गोंधळ उडाला.कुटुंबातील लोकांनी व ग्रामस्थांकडून पाहताक्षणीच मृतदेहाची ओळख पटली असल्याचे समजते

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

काटेरी झुडपात आडकल्याने प्रेत आढळून आले अन्यथा लाटेवर वाहून गेले असते तर तपास लागणे मुश्किल झाले असते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सदरचा प्रकार आवाटी ता करमाळा येथे घडला असून युवकाची बाॅडी पोस्टमार्टम साठी करमाळा येथील कुटीर रूग्णालयात आणली असल्याचे समजते. याबाबत पोलीस स्टेशन कडुन सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होवु शकला नाही.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts