loader
Breaking News
Breaking News
Foto

पक्षांतर बंदी कायद्याचा दणका !सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात गेलेले १० नगरसेवक ठरले अपात्र

निवणुकीत होणारा घोडेबाजार थांबवण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्यानुसार लागु केलेला आहे मात्र या कायद्याला न जुमानता अनेक जिल्हापरिषद, नगरपालीका निवडणुकीत पक्षांतर करण्याचे धाडस सदस्य दाखवत आहेत असाच प्रकार रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे झाला होता शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सेनेचे दहा नगरसेवक भाजापात गेले होते त्यांना रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र करण्यात आले आहे.विशेष या दहाजणामध्ये एक शिवसेना पुरस्कृत केलेल्या नगरसेवकाचा देखील समावेश आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली. मे महिन्यात शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेलेल्या माथेरान नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मोठा दणका दिला. भाजपवासी झालेल्या या दहाही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिला आहे. माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

.माथेरान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथस आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे या दहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी अपात्र घोषित केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

प्रसाद सावंत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. याबाबतची अखेरची सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी सुनावणीचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज नऊ नगरसेवकांसह एक स्वीकृत अशा दहाही भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित आहे. तसा आदेश सर्व नगरसेवक यांना पोस्टाने पाठवण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षात गेलेल्या या नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts