loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे डायलिसीस सेंटर मंजूर . आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने डायलिसिस सेंटर मंजूर झाले असून त्याचा फायदा तालुक्यातील गोरगरीब जनतेने घ्यावा असे आवाहन आमदार संजय मामा शिंदे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की यापूर्वी तालुक्यातील रुग्णांना डायलिसिस साठी नगर ,सोलापूर ,अकलूज, बार्शी आदी ठिकाणी जावे लागत होते .याकामी लोकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. वाहतूक खर्च व वेळही वाया जात होता. त्यामुळे आपण राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेशजी टोपे यांचे कडे पाठपुरावा केला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा येथे 2 मशीन मिळणार आहेत व त्यासाठी आवश्यक असणारा RO प्लँट व इतर आवश्यक बाबीची पूर्तता केली जाणार असून लवकरच डायलिसिस सेंटर कार्यन्वित होईल .या सेंटर मुळे सर्पदंशाने किडनी विकार उद्भवलेले, किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला दिलासा मिळणार आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाला यापूर्वीच आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत सिजरियन सुविधा, डिजिटल एक्स-रे मशीन , 30 बेडची सेंट्रल ऑक्सीजन लाईन ,ऑक्सीजन प्लांट, 50 कॉटचे श्रेणी वर्धन करून 100 कॉट मध्ये रूपांतर आदी सुविधा यापूर्वी झालेल्या आहेत. आता डायलिसिस सेंटर सुरू होणार असल्यामुळे याचा फायदा तालुक्यातील जनतेला होणार आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts