जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी 1 येथील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त आकाश कंदील बनवण्याचा उपक्रम शाळेमध्ये राबवला. या उपक्रमाचे करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री मनोज राऊत साहेब यांनी कौतुक केले.
या उपक्रमामध्ये इयत्ता सहावी व सातवी तील विद्यार्थी सार्थकी देशमुख ,आदित्य भिसे, रोहन सरडे, समृद्धी उघडे, आफ्रीन मुलाणी, प्रीती भागवत ,कार्तिकी वाघमारे ,गायत्री कांबळे व रचना कदम यांनी भाग घेतला व त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे आकर्षक आकाश कंदील बनवले. त्यांना वर्ग शिक्षिका श्रीमती मुमताज फकीर मॅडम व शाळेतील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सदर उपक्रमाचे पंचायत समिती येथे येथे प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी सभापती श्री अतुल पाटील, गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत साहेब, उपसभापती सौ केशर चौधरी, जिल्हा परिषद सदस्य श्री बिबीशन आवटे, पंचायत समिती सदस्य श्री दत्तात्रय सरडे, श्री सुनील सावंत, श्री शेखर गाडे ,श्री दत्तात्रय जाधव गट शिक्षणाधिकारी श्री राजाराम भोंगसाहेब शिक्षक नेते श्री चंद्रकांत चोरमले सर व केंद्रप्रमुख श्री आजिनाथ तोरमल सर श्री.दादासाहेब खटके सर श्री.सतिश चिंदे सर उपस्थित होते. पोलीस स्टेशन करमाळा येथील पोलीस निरीक्षक श्री कोकणे साहेब व तहसील कार्यालय येथील नायब तहसीलदार श्री जाधव साहेब यांनाही कार्यालयात लावण्यासाठी आकाश कंदिलाचे वितरण करण्यात आले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.