loader
Breaking News
Breaking News
Foto

आर्थिक गती वाढविण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक कटिबध्द- महाव्यवस्थापक श्री.एस. टी.सावंत

कोरोना मुळे झालेल्या आर्थिक अधोगतीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रातील कर्ज योजना राबविण्यात विदर्भ कोकण ग्रामीण बँक सतत अग्रेसर राहील असे प्रतिपादन बँकेचे महाप्रबधक श्री सावंत सर यांनी केले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सोलापूर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत शाखा जेऊर आणि करमाळा शाखेच्या वतीने भारत सरकार राबवित असलेल्या "क्रेडिट आउटरीच कॅम्प व सतर्कता जागरूकता सप्ताह" अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी श्री.सावंत बोलत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कार्यक्रमास बँकेचे महाव्यवस्थापक श्री.एस. टी.सावंत ,क्षेत्रीय प्रबंधक श्री.पंकज धुरी, सभापती श्री अतुल पाटिल, गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत,ज्योतीताई पाटील,मा.शेखर गाडे प स सदस्य ,बिभीषण आवटे, जि.प.सदस्य,सरपंच श्री भारत साळवे ,विनोद गरड,संतोष वाघमोडे,कुदळे भाऊसाहेब,आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बँकेच्या जेऊर शाखेतील 58 व करमाळा शाखेतून 7 बचत गटांना, तसेच वाहन कर्ज लाभार्थी व विविध कर्ज योजनेतील प्रातिनिधिक कर्जदाराना रु. 93लाखाचे कर्ज मंजुरी पत्रे वितरीत करण्यात आली. याप्रसंगी अधिक बोलताना श्री.सावंत म्हणाले की बँक ही सातत्याने विविध योजना राबवून ग्राहकांची प्रगती केली तसेच अनेकांचे जीवनमान उंचावले आहे

उमेश पवळ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सत्यप्रकाश मेहता यांनी प्रास्ताविक मध्ये भारत सरकारच्या क्रेडिट आउटरीच कॅम्प व सतर्कता जागरूकता सप्ताह या उपक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी सर्व उपस्थित ग्राहक व मान्यवरांनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी शपथ घेतली. यावेळी सर्व उपस्थितीनी शपथ वाचन केले. या कार्यक्रमास बँकेचे शाखाधिकारी श्री प्रविण जोशी, श्री शरद सावंत, श्री पठाण, श्री रमेश वारे, श्री गणेश शिंदे,श्रीकृष्ण कोठावळे,हरी जाधव,विजय माने, आदी मान्यवर व ग्राहक उपस्थित होते.शेवटी श्री पठाण यांनी सर्वाचे आभार मानले.या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेऊर व करमाळा बँकेचे अधिकारी, तसेच सर्व कर्मचारी, बिसी, बँक सखी आदींनी परिश्रम घेतले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts