loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा येथे जुनी पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन!

:-नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना व नंतर रूपांतरित झालेली राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.ही योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शुक्रवारी सकाळच्या सत्रात तहसील कार्यालय करमाळा येथे1 कर्मचाऱ्यांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी जुनी पेन्शन लागू करणेबाबत निवेदन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी करमाळा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हानेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी गट ड महासंघ आयोजित केलेल्या या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सहभागी झालेली असून 1 नोव्हेंबर 2005 नंतर मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची हेळसांड तातडीने थांबविण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष अरुण चौगुले यांनी दिली.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी शिक्षक नेते चंद्रहास चोरमले, श्री सतिश चिंदे, श्री विनोद वारे, श्री पोपट पाटील, श्री प्रसाद कुलकर्णी श्री आदिनाथ देवकते, श्री दादासाहेब खटके, श्री शिवाजी ढेरे,श्री लहू गभाले व करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती चे आदी.पदाधिकारी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts