loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा पंचायत समितीच्या वतीने कुंभेज गणात कार्यशाळा संपन्न!

करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे पंचायत समितीच्या वतीने "आमचा गाव आमचा विकास हा कार्यक्रम" घेण्यात आला .या वेळी करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए जे आदलिंगे साहेब यांनी गावच्या विकास आराखडा 2022/2023याबाबत कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यामध्ये गावच्या विकासासाठी काय काय करता येईल आरोग्य, जलसंपदा, शिक्षण ,आदि बारा योजना ह्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्या सहयोगाने करावे लागतात. यासाठी गावचा विकास करण्यासाठी आराखडा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी आता 15वा वित्त आयोग चालू आहे. स्वच्छता ,आणि पाणी पुरवठा साठी 60टक्के खर्च करवा लागणार आहे तर 40टक्के इतर कामासाठी खर्च करावा लागणार आहे .असे विस्तार अधिकारी आदलिंगे यांनी सांगितले.

उमेश पवळ (चौफेर प्रतिनीधी )

या कार्यशाळेत मिळालेल्या मार्गदर्शना मुळे ग्रामसेवक व सरपंच यांना गावाचा विकास आरखाडा तयार करत असताना नेमका कोणत्या समस्यांना व कामांना आगोदर प्राधान्य देयचे हे समजल्याने विकास आराखडा तयार करणे सोप्पे जाणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी कार्यक्रमासाठी कुंभेज गणातील विविध गावचे सरपंच ,ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts