loader
Breaking News
Breaking News
Foto

विज बिल वसुलीसाठी सरकारची नवीन चाल साखर आयुक्तांना हाताशी धरून वसुलीचा प्रयत्न. शेतकऱ्यांच्या परस्पर कारखान्याला हाताशी धरुन वसुली कराल तर याद राखा ! भाजपा सरचिटणीस अमरजित साळुंके यांचा महावितरणला इशारा

विज बिल वसुलीसाठी सरकारची नवीन चाल समोर आली असून साखर आयुक्तांना हाताशी शेतकऱ्यांच्या उस बिलातुन परस्पर वीजबिल वसुलीचे प्रयत्न सुरु आहेत यास भाजापने विरोध दर्शवला असून शेतकऱ्यांच्या परस्पर कारखान्याला हाताशी धरुन वसुली कराल तर याद राखा ! असा थेट इशारा भाजपा सरचिटणीस अमरजित साळुंके यांचा महावितरणला दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कृषी वीज बिल वसुली हा शेतकरी व वीज कंपनी यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्याशी कारखान्यांचा कसलाही संबंध नाही. त्यामुळे साखर कारखाना व साखर आयुक्त कृषी विजबिलाच्या वसुलीचा कायद्याने हा अन्यायकारक जुलमी निर्णय घेऊ शकत नाहीत असे असतानाही साखर आयुक्त यांनी विजबिले वसूल करण्यासंदर्भात महावितरण व साखर कारखाने यांची ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

अशा पध्दतीने हे जुलमी राज्य सरकार विवीध प्रकारच्या क्लुप्त्या वापरून शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारच्या या प्रकाराचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे असे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी बोलताना सांगितले आहे.उलटपक्षी मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाची बिले अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसतांनाही काही साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळालेच कसे याचीही चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

साखर कारखान्यांना शेतकऱ्यांनी स्वखुशीने लेखी हमीपत्र दिले तरच साखर कारखाना ऊस बिलातून वसुली करून वीज कंपनीला देऊ शकेल, अन्यथा कुठल्याही प्रकारची सक्ती झाली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असाही इशारा श्री. साळुंके यांनी दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts