loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा

दिनांक 26/10/2021 रोजी दत्त पेठ येथील समंतभद्र मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वा विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास करमाळाचे माजी आमदार नारायण (आबा)पाटील,जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्धजी कांबळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, भाजपाचे ज्येष्ठ नेते घनश्याम गांधी, यश कल्याणीचे गणेश भाऊ करे पाटील, सवितादेवी राजेभोसले, भाजपाचे नेते महादेव अण्णा फंड, युवा नेते शंभूराजे जगताप,बोरगावचे सरपंच विनय ननवरे, मा सभापती शेखर तात्या गाडे, भाजपा नेते संजय घोरपडे भाजपा किसान जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारिया, नगरसेवक अतुल भैया फंड, प्रवीण जाधव, युवा नेते महेंद्र पाटील, आबासाहेब टापरे, मनसे तालूका प्रमुख संजय (बापू)घोलप,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, युवक काँग्रेसचे अभिषेक आव्हाड,समर्थ दूध चे चेअरमन गणेश महाडिक तालुका संघटन सरचिटणीस शशिकांत पवार भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनीताई भालेराव तालुका अध्यक्ष भाग्यश्री ताई कुलकर्णी व शहराध्यक्ष संगीताताई नष्टे व करमाळा तालुक्यातील व शहरातील सर्व राजकीय मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या कार्यक्रमांमध्ये रक्तदान शिबिर या मध्ये 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले , मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर मध्ये 63 जणांची तपासणी केली , तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी 7 जणांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे , मोबाईल आधार लिंकिंग शिबिरा मध्ये 47जणांची नोंदणी केली असून , बँकेच्या विविध योजनांचे सेवा केंद्र तसेच करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध चित्रकार प्रतिक जाधव यांच्या चित्राचे भव्य प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या कार्यक्रमाचे नियोजन केशव प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या वतीने अत्यंत नेटके व दिमाखदार करण्यात आले होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कार्यक्रमचे सूत्रसंचालन नंदकुमार वलटे यांनी केले व आभार मिलिंद माने यांनी मानले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts