loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामीण भागातील पथदिवे दिवसा सुरु दिसल्यास ग्रामसेवकांवर कडक कारवाई, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचा ग्रामसेवकांना इशारा!

ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये दिवसा देखील स्ट्रिट लाईट पथदिवे सुरु असतात त्यामुळे ग्रामपंचायतीला अधिकच्या वीजबीलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे या प्रकाराबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत तिव्र नाराजी व्यक्त केली असुन दिवसा (पथदिवे) सुरु असल्यास संबंधित ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या संबंधित प्रत्येक ग्रामपंचायतीला नोटीसा देखील बजावण्यात आल्या आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या नोटीस मध्ये गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी म्हटले आहे की करमाळा गटामधील असलेल्या ग्रामपंचायतींना काही कामानिमीत्त अथवा तपासणी कामी फिरती करीत असताना गावामधील स्ट्रीट लाईट( रस्त्यावरील दिवा )दिवसा सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे हि बाब अतिशय असमाधनकारक आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यामुळे वीज बिलाच अतिरिक्त भार ग्रामपंचायत कार्यालयावर पडत आहे तरी याद्वारे आपणास सुचना देण्यात येतात कि आपले कार्यक्षेत्रामधील गाव,वाडी व वस्ती रोडवरीलविजदिवे सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरु ठेवावेत.स्ट्रीट लाईट चालु बंद करणेसाठी गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी स्विचबोर्ड तयार करण्यात यावा.तसेच ग्रा.पं.कर्मचारी यांना या कामासाठी प्राधिकत करावे या कामी दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्यावी.तथापी यापुढे फिरतीवर असताना माझे तसे निदर्शनास आल्यास आपले विरुध्द योग्य ती कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.असा इशारा देण्यात आला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts