करमाळा तालुक्याच्या उत्तर व पश्चिम भागावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. या भागातील शेतकरी आजही पाण्यापासून वंचित आहे. या भागाला पाणी मिळून देण्यासाठी व पाण्यासह वीज, रस्ते, व अन्य समस्या सोडविण्यासाठी आपण जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र लढा उभा करणार आहोत असे स्पष्ट मत जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुलभाऊ खुपसे-पाटील यांनी व्यक्त केले.
करमाळा तालुक्यातील मौजे पिंपळवाडी येथे आयोजित जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब चव्हाण युवा जिल्हा अध्यक्ष ) जनशक्ति शेतकरी संघटना शरद काळे. लक्ष्मन सोनवणे.विजय भांडवलकर .रावसाहेब जाधव. संदीप पवार.सुनिल जाधव. निकेल काळे. यशवंत चव्हाण .नाथा कांबळे .सोमनाथ कांबळे. नंदू चव्हाण .दत्ता कांबळे.आदित्य चव्हाण. गजानन चव्हाण .भारत गरड .विशाल काळे वांजरवाडी शाखा प्रमुख किरण बिनवडेपवार वस्ती शाखा प्रमुख श्रीकांत पवार पिंपळवाडी शाखा प्रमुख योगेश चव्हाण माझी सरपंच अनिल काळे माजी उप सरपंच राहुल कांबळे शरद एकाड राणा महाराज रोहण नाईक हर्षवर्धन पाटील, राम विटकर, दिलीप देशमुख (सावडी) आदिजण उपस्थितीत होते.
यावेळी या कार्यकर्त्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार खुपसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना अतुलभाऊ खुपसे पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्यातील उत्त्र भागातील मौजे पिंपळवाडी, रोशेवाडी, हिवरवाडी, रावगाव, वंजारवाडी, लिंबेवाडी, राखवाडी, पुनवर, मोरवड, भोसे या गावासह पश्चिम भागातील वीट, अंजनडोह, विहाळ, कोर्टी, सावडी, पोंधवडी, राजुरी, यागावामध्ये शेतीला पाणी मिळत नाही. कुकडीचे पाणी या गावासाठी मृगजळ ठरलेले आहे. कुकडीच्या पाण्यावर राजकर्त्यांनी राजकारण केले. निवडणूकीच्यावेळी मते मिळविण्यासाठी या पाण्याचा उपयोग केला. मात्र कुकडीचे पाणी या भागातील शेतकऱ्यांना आता पर्यंत पाणी आले आले व पाणी गेले गेले या पध्दतीचे होवून बसले आहे. खऱ्या अर्थाने या भागातील शेतकऱ्यांनी राज्यकर्त्यांनी फसवणूकीचे काम केले आहे. यापुढे मा्र जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांला न्याय मिळवून देण्यासाठी रस्याारवर उतरुन न्याय मिळणे पर्यंत रक्ताचे पाणी करु असे स्पष्ट करुन यापुढे या भागातील रस्ते, वीज, यासह गावठाण जमिनीचे तंटे, महसुल विभागातील प्रश्नसोडविण्यासाठी तीव्र आंदोलन उभा करणार असल्याचेही अतुल खुपसे पाटील यांनी सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.