loader
Breaking News
Breaking News
Foto

वीट पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटातुन तेजेश ढेरे च्या रूपात नविन चेहरा पुढे येण्याची शक्यता?

आगामी काळात होवु घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती चा बिगुल वाजणार आहे अशातच बरेच जण करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी इच्छुक असुन अशातच वीट गावातील सामाजिक कार्यकर्ते तेजेश ढेरे यांचे नाव पुढे येत असुन अंतर्गत तर एक मोठा गट तेजेश ढेरे हा उमेदवार आपल्या गटातून असेल तर काय होईल याची चाचपणी करत आहे तेजेश ढेरे यांचे सामाजिक कार्य मोठे असुन ,त्या बरोबर त्यांचे स्वतःच्या वीट गावात सर्व राजकीय गटा बरोबर चांगले संबंध आहेत त्या बरोबर गावातील सर्व जनतेबरोबर जिव्हाळ्याचे व मैत्री पुर्ण संबंध आहेत त्या बरोबर च वीट गणातील इतर सर्व गावात तेजेश यांचे मोठे नेटवर्किंग आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पहीले कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले तेजेश ढेरे सध्या कर्जत जामखेड चे आमदार रोहीत दादा पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात ,स्वताच्या बोअरवेल व्यवसायातुन,सामाजिक कामातून,तसेच सोशल मिडिया च्या माध्यमातून तेजेश ढेरे घरोघर पोहचले असुन या दोन तीन वर्षात स्वता ची एक वेगळीच ओळख त्यांनी निर्माण केली आहे, येणार्या काळात जर त्यांना वीट पंचायत समिती गणातुन संधी मिळाली तर निश्चितच एक तगडा उमेदवार असु शकतो एवढे मात्र नक्की.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या विषयी तेजेश ढेरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की शेवटी भविष्यात जनताच आपले दैवत असुन तेच काय ते आधी ठरवतील मी काल ही आणी आज ही आणि उद्या ही शून्य च आहे ,जो काही मान, पाण प्रतिष्ठा, प्रेम मिळत आहे ते केवळ जनतेमुळेच , आपण शेवटपर्यंत जनतेसाठी सामाजिक कार्य करत राहु शेवटी जनताच आपली मालक आहे आणि आपण त्यांचे चाकर आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts