loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखलठाण येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत १५ ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा - सरपंच चंद्रकांत (काका) सरडे यांची माहिती

चिखलठाण येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत १५ ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती चिखलठाणचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक चंद्रकांत काका सरडे यांनी करमाळा चौफेर शी बोलताना दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधीक बोलताना चंद्रकांत काका सरडे म्हणाले की विकासकांमाच्या यादी मध्ये कुगांव ते चिखलठाण जेऊर प्रजिमा झिरो ते पाच किमी डांबरीकरण करणे ( दोनशे पन्नास लक्ष ) मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत लांडाहिरा ते मार्कड वस्ती दोन. किमी डांबरीकरण करणे 175 लक्ष , जल जीवन मिशन अंतर्गत चिखलठाण नंबर 1 व 2 पाणीपुरवठा योजना भूमिपूजन 160 लक्ष , चिखलठाण नंबर 2 मारुती मंदिर सभामंडप बांधकाम करणे सहा लक्ष , आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ते खडीकरण करणे सहा लक्ष , दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत हरिजन वस्ती मातंग वस्ती पेवर ब्लॉक बसवणे 9 लक्ष ,नागरी सुविधा योजना अंतर्गत हायमास्ट दिवे बसविणे दहा लक्ष आदी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप आहे यांची उपस्थिती असुण यावेळी आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजीबापु झोळ, बारामती ॲग्रो चे सुभाष गुळवे , , मांगी चे ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, झरे सरपंच प्रशांत पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, जिल्हा परिषद सदस्य निळकंठ देशमुख , माजी चेअरमन वामनराव बदे ,दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले , मकाई चे माजी चेअरमन आप्पासाहेब झांजुर्णे , अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी , नगरसेवक अतुल फंड , महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे , माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील ,संचालक पोपट सरडे , पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव साडे ,सदस्य ॲड राहुल सावंत , सूर्यकांत पाटील , काँग्रेसचे सुनील बापू सावंत , भास्कर भांगे , देवळाली चे सरपंच आशिष गायकवाड , युवा नेते श्रीकांत साखरे कवीटगांव चे सरपंच शिवाजी सरडे शंभूराजे बोराडे, महादेव कामठे , डॉ .गोरख गुळवे , योगेश बोराडे , राजेंद्र धांडे ,सुहास गलांडे , माजी जिल्हा परिषद सदस्य विलास राऊत ,रमेश बोराडे ,सुधीर पोळ , बोरगावचे विनय ननवरे , उमेश पात्रुडकर , सामाजिक कार्यकर्ते बालाजी गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.चिखलठाण तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत चे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे यांचा शुक्रवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असुन चंद्रकांत काका सरडे युवा मंच च्या वतिने आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत काका सरडे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला असल्याचे देखील युवा मंच च्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विविध विकास कामांचे उद्घाटना बरोबरच कोवीड योद्ध्यांचा सन्मान सोहळा करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे.कोरनाचे नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts