loader
Breaking News
Breaking News
Foto

नऊ महिलासंह साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाला निघाल्या होत्या शुभांगी पवार परंतु काळाने घातला घाला!

साताऱ्यातील हिरकणी ग्रुपच्या महिला बाईक राईड करत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र या ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. 32 वर्षीय शुभांगी यांचे नांदेडजवळ अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे अपघाती निधन झाले. बाईकवरुन पडल्यानंतर टँकर डोक्यावरुन गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला  हिरकणी रायडर्स सातारा च्या शुभांगी पवार या महिला सबलीकरणासाठी अग्रेसर होत्या. नवरात्री दरम्यान काढलेल्या यात्रेत त्यांनी महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर बाबत जनजागृती करण्याबाबत तसेच रस्ते सुरक्षा बाबत जागृती करण्यासाठी पुढाकार घेतला होता. साडेतीन शक्तिपीठं म्हणजे अर्थात कोल्हापूरची महालक्ष्मी, माहुरची रेणूका माता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तश्रृंगी यांचा समावेश होता. कोल्हापूर, तुळजापूरच्या देवींचं दर्शन घेऊन महिलांचा ग्रुप नांदेडमार्गे माहुरला जात असताना हा अपघात झाला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या 10 ऑक्टोबर रोजी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी बाईकने निघाल्या होत्या. नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्याची ही मोहीम होती. त्यांनी कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. तिथून तुळजापूरला आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले

✍ चौफेर नांदेड (प्रतिनीधी)

-"नांदेडमध्ये टँकर चालकाची धडक"- माहूर गडावर रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकर फाटा दाभड येथे टँकर चालकाने जोरदार धडक दिली. बाईकवरुन पडल्यानंतर टँकर डोक्यावरुन गेल्यामुळे शुभांगी पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर जि. नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

-"टँकर ताब्यात" -अपघातानंतर पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक कपील अगलावे, पोलीस कर्मचारी महेंद्र डांगे, महामार्गाचे रमाकांत शिंदे, गजानन डवरे, वसंत सिनगारे, मृत्यूंजय दूत गोविंद टेकाळे यांनी मदत केली. टँकर जि. जे. 12 ए.टी. 6957 हा टँकर अर्धापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts