आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कार्पोरेशन कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी न मागता घरपोच नोड्युज दाखला देणे व शेतकऱ्यांकडून कारखान्याबाबत तक्रार नसल्याच्या सह्या घेण्याच्या प्रकार सुरु आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आशी मागणी शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे .त्यांनी म्हटले आहे की एरव्ही शेतकऱ्यांकडून संबंधित बॅंकेला नोड्युज दाखल्या मागीतल्यांनतर चार्ज आकरला जातो तसेच ठराविक वार दिलेल्या दिवशीच दाखला दिला जाईल असे सांगून शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला बॅंकेकडुन भाग पाडले जाते मात्र आत्ता शेतकऱ्यांकडून मागणी नसताना विठ्ठल कार्पोरेशन चे कामगार बॅंकेचे नोड्युज शेतकऱ्यांना घरपोच करत आहेत व कारखान्याबाबत तक्रार नसल्याचे लेखी घेत आहेत हा गंभीर प्रकार असुन शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे असे आवाहन केले असून,म्हैसगाव ता माढा कारखान्याने काढलेले विनासंमती बोगस कर्जप्रकरण मिटवताना आ. संजय शिंदे व संबंधित बँका शेतकऱ्यांची आणखी फसवणूक करण्याच्या तयारीत असुन या विषयी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही दस्त ऐवज कागदपत्रांवर सही करु नये, असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना मा आ पाटील यांनी सांगितले की आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीवर मोफत खते देतो असे आमिश दाखवून महत्वाची कागदपत्रे आपल्या म्हैसगाव ता माढा येथील विठ्ठल कार्पोरेशन लि या खाजगी साखर कारखान्याच्या माध्यमातून गोळा केली. परंतू शेतकऱ्याला खते देणे तर दुरच, त्यांची आधार व सातबारा उतारे वापरुन विनासंमती कर्ज काढले. राज्यातील विविध बँकांकडून अशी कोट्यावधी रुपयांची कर्जे काढली व सदर रक्कम वैयक्तिक कामासाठी वापरली. शेतकर्यांच्या हातात बँकानी पाठवलेली कर्जफेडी संदर्भातील जप्ती नोटीस हाती पडल्याने हा प्रकार उजेडात आला. यानंतर आमदार शिंदे यांनी सावरासावर करत संबंधित बँकाशी वन टाईम सेटलमेंट (एक रकमी परतावा) करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतू मागील आठवड्यात परत एकदा शेतकऱ्याला संबंधित बँकेने नो ड्युज दाखला पाठवून दिला आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे बँकेचा हा नो ड्युज दाखला घेऊन बँक कर्मचारी नव्हे तर विठ्ठल कार्पोरेशन लि या आ संजय शिंदे यांच्या खाजगी कारखान्याचे चीट बाॅय कर्मचारी शेतकऱ्याला हा दाखला देत आहेत व एका कागदावर आमची विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्या बद्दल कसलीही तक्रार नसल्याचा उल्लेख असलेल्या मजकुराखाली सही घेत आहेत. हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून परत एकदा शेतकऱ्याची विठ्ठल कार्पोरेशन या कारखान्याकडे पुर्वी जमा असलेली कागदपत्रे पुन्हा एकदा वापरुन त्यावर इतर बँकाकडून नवीन कर्ज काढण्यासाठी होत असावा अशी दाट शक्यता आहे. कारण कोणतीही बँक ही जर खातेदार अथवा कर्जदाराने नवीन कर्जप्रकरणी नो ड्युज सर्टीफिकेट मागणी केली तरच बँक सदर दाखला देते. आता शेतकरी मागणी करत नसताना त्यांना हा दाखला देण्यामागचा बँकेचा उद्देश काय आहे याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी असे पाटील यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या नो ड्युज दाखल्यावर आ संजय शिंदे यांच्या कारखान्याने उचललेले मागील कर्ज हे पिक कर्ज होते असा उल्लेख आहे. यामुळे तर यातील सर्व प्रकार हा पुर्ण फसवणुकीचाच आहे हे सिध्द होत आहे. शेतकर्यांच्या नावावर पिक कर्ज म्हणून रक्कम शेतकऱ्याला माहिती न देता व माहीती होऊ न देता काढायचे व शासनाच्या कर्जमाफी या कर्जप्रकरणांचा समावेश झालाच तर कोट्यावधी रुपये वरच्यावर वापरुन वापरुन स्वतः चे खिसे भरावयाचे असा डाव असण्याचे आता नाकारता येत नाही. यामुळे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना आपण या नो ड्युज प्रकरणी लक्ष देऊन संबंधित सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अन्यथा परत एकदा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला फसवले जाण्याची शक्यता आहे यामुळे हा प्रकार तात्काळ थांबवून शेतकऱ्यांवर होऊ घातलेल्या अन्यायाचे वेळीच निवारण करावे व दक्षता घ्यावी अशी विनंती करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.