loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकरी सन्मानार्थ होणाऱ्या बंद बाबत राष्ट्रवादी किसान सभेचे पोलीसाना निवेदन

उत्तर भारतातील शेतकरी गेली अनेक महिने आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करून आपलें म्हणणे सरकार पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु वेळोवेळी हे आंदोलन भाजपा सरकार तर्फे दाबण्याचा, भरकटविण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांना पूर्णत:यश आलेले नाही. शेतकरी आंदोलन साम, दाम,दंड,भेद वापरून देखील संपत नसल्यामूळे दहशतीद्रुरे शेतकऱ्यांनाच संपविण्याचा घाट आता भाजप सरकारने चालविला आहे, उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व तीव्र चीड आणणारा आहे. भारत कृषी प्रधान देश असताना या देशात शेतकऱ्यांना अशी वागणूक का?

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अशावेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असून या निर्दयी कृत्याचा निषेध सोमवार, दि 11ऑक्टोबर 2021,रोजी महाराष्ट्र्र बंद पाळण्यात येणार आहे त्या नुषगाणे महाविकास आघाडी तर्फे करमाळा बंद ठेवत आहोत

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

महाविकास आघाडी तर्फे करमाळा बंद ठेवत आहोत व उत्तर प्रदेश मध्ये मृत्यू मुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र सरकार च्या या विक्षिप्त कृतीचा निषेध करणार आहोत, राष्ट्रवादी किसान सभा यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा बंद पाळण्यात येणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

निवेदानावर राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संतोष वारे, राष्ट्रवादी किसान सभा चे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह शकडो शेतकरी व पदाधीकारी यांच्या सह्या आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts