पाटील गटाकडून कोंढेज येथील भवानी देवीला भोगी करुन तलावात फुले अर्पण करण्यासाठी जात असताना तुम्ही संजयमामा यांनी सोडलेल्या पाण्याचे पुजन का करता म्हणून कार्यकर्त्यांवर हल्ला झाला .या वेळी दोन्ही गटातील झालेल्या भांडणा वेळी युवा नेते पृथ्वीराज पाटील हे उपस्थित नव्हते मात्र राजकीय द्वेषातुन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून याचा आम्ही तिव्र निषेध करत असल्याचे युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड यांनी सांगीतले असून या संदर्भातील निवेदन पोलीस स्टेशन ला देण्यात आले आहे.
या निवेदनावर युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव उपतालुकाप्रमुख दादासाहेब तनपुरे जिल्हा सरचिटणीस दिग्विजय अंबारे उपसरपंच नाथा रंधवे सर योगेश कर्णवर गणेश कांबळे संजू तनपुरे भैया शिंदे जय राम तात्या सोरटे सागर कोकाटे संतोष सोनवर मयूर शिंदे सुधीर आवटे प्रसाद निंबाळकर अविनाश भिसे पोमा पठाण बाळनाथ रणसिंग आकाश साळवे सचिन चोरमुले यांच्या सह्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की सदर गुन्ह्याची वेळ व पृथ्वीराज पाटील यांच्या मोबाइल चे लोकेशन चेक करावे .केवळ पृथ्वीराज पाटील यांची वाढत चालेली लोकप्रियता खटकत असल्याने व त्यांना बदनाम करण्याच्या हेतुने पृथ्वीराज पाटील यांच्यावर हा कट रचला आहे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून पृथ्वीराज पाटील यांच्यावर दाखल केलेला गुन्हा माघार घ्यावा अन्यथा युवा सेने च्या वतिने तिव्र आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.