loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा चौफेर च्या बातमीची आमदार संजयमामा शिंदे यांनी घेतली दखल जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे खड्डे बुजविण्याचे काम होणार सुरु - आ. संजयमामा शिंदे यांची माहिती.

करमाळा तालुक्यातील जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचा विषय नेहमीच चर्चेत असतो. या महामार्गाचे हस्तांतरण असो, नव्याने चौपदरीकरण असो किंवा या महामार्गावरती होणारे वेगवेगळे अपघात असो हा महामार्ग नेहमीच चर्चेत असतो.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सध्या या महामार्गावरती पडलेले खड्डे हा चर्चेचा विषय होता.सा करमाळा चौफेर ने जातेगाव टेंभुर्णी रस्त्यावरील खड्डया बाबत सातत्याने आवाज उठवला होता.या मागणीची आमदार संजयमामा शिंदे यांनी दखल घेतली असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे मुरुमाने भुजविण्याचे काम सुरू केलेले असून पावसाळा संपल्यानंतर त्याचे डांबरीकरण केले जाईल अशी माहिती तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. एम. उबाळे यांनी पावसामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करता आलेली नाही अशी माहिती दिली. तरी सध्या जातेगाव बाजूकडून खड्ड्यामध्ये मुरूम भरण्याचे काम सुरू आहे. पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यानंतर सदर खड्ड्यांमध्ये डांबरीकरण केले जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts