loader
Breaking News
Breaking News
Foto

स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या युवकाचा व्यायाम करताना ह्रर्दयविकाराने मृत्यु! वांगी सह पंचक्रोशीत हळहळ.

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेला वांगी नं २ येथील २४ वर्षीय युवकाचा व्यायाम करत असताना ह्रर्दयविकाराने मृत्यु झाला आहे.सतिश विलास जाधव असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सतिश जाधव याचे ग्रॅज्युएशन पुर्ण झाले असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.नुकताच राजस्थान येथे पार पडलेल्या धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता.पि एस आय होण्याचे त्याचे स्वप्न होते.नुकत्याच जाहीर झालेल्या रिजल्ट मध्ये त्याचा ६१ स्कोर आला होता. अत्यंत हुशार आणी कष्टाळु असलेल्या सतिश ला शेतीची देखील आवड होती . परवा झालेला बैल पोळा देखील कुटुंबाने एकत्रित येऊन साजरा केला होता त्याचे फोटो त्याने शेअर केले होते.त्याचा कुटुंबासोबतचा हा शेवटचा फोटो ठरला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आई वडील भाऊ भावजय आसा सतीश यांचा परिवार असून मोठ्या कष्टातून जाधव परिवाराने आपल्या प्रपंचात प्रगती साधली होती .सतिश ला चांगली नोकरी लागावी तो मोठा आधाकारी व्हावा अशीच सर्वांची इच्छा होती मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

हुशार, कष्टाळु व सर्वांचा लाडका असलेला सतिश याच्या आचानक जाण्याने वांगी सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts