शेलगाव ते ढोकरी रस्ता व वांगी ते पांगरे रस्ता या दोन गावांच्या रस्त्याचां वाद पेटला आहे. ढोकरी वांगी ,भिवरवाडी नरसोबावाडी,वांगी 4 आदि गावाना जोडला जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी आडवला आहे आशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने माढा येथील तहसीलदार उद्या स्थळ पाहणी करणार आहेत मात्र प्रत्यक्षात आडवलेला रस्ता हा खासगी असुन याची ग्रामपंचायत, जि प बांधकाम, किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयात नोंद नसल्याचे रस्ता आडवणारे शेतकरी सांगत आहेत.
रस्ता आडवल्याचा आरोप असलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की वांगी नंबर 3 हद्दीतील गट नंबर 138 मधे 5 भावाच्या भाऊ वाटणी प्रमाणे जमिनीचे वाटप झाले आहे त्यासाठी स्वतः च्या हद्दीतून शेती वहिवाटीसाठी 12 फुटाची वाट ठेवलेली आहे. सदरील वाट ग्रामपंचायत अथवा पंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कोणत्याही रेकॉर्ड ला नोंद नाही असे त्यांच्याकडून आम्हाला लेखी पत्र देण्यात आलेले आहे. वांगी गावठाण बसण्यासाठी 7 एकर जमीन संपादित करुनही कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही व उजनी धरणासाठी गट नंबर 154 पूर्ण पाण्यात गेलेला आहे त्याचाही कोणताच मोबदला मिळाला नाही. त्याच गटातून जुन्या वांगी साठी जाणारा 82 फुटाचा रस्ता संपादित करून घेतला आहे. आता आम्ही अल्पभूधारक शेतकरी झालो आहे तरी सरकार आमच्यावर कितीवेळा अन्याय करणार आहे असा सवाल वांगी येथील युवा शेतकरी गणेश रोकडे यांनी विचारला आहे. तसेच आता नवीन स्थानिक लोकांच्या मागणी नुसार जो रस्ता हवा आहे त्याचे सरकारने संपादन करुन आम्हाला योग्य मोबदला द्यावा आशी आमची मागणी आहे . मात्र जाणीवपुर्वक काही स्थानिक पुढारी आम्हाला कोणताही मोबदला मिळू नये म्हणून आणि राजकीय पदाचा गैरवापर करुन सर्वसामान्य शेतकर्याला वेठीस धरून लोकं भडकावन्याचा प्रयत्न चालू आहे व जाणूनबुजून खोट्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करुन लोकांना भडकवून देत आहेत.
आता वांगी ग्रामपंचायत च्या निवडणुका आल्यामुळे स्थानिक पुढारी लोकांचा जमाव करून स्टंटबाजी करत आहेत. सर्वसामान्य जनतेने त्यांना चांगल ओळखून सोडलेले आहे. स्थानिक पुढारी सरकारकडे संबंधित शेतकर्याला नुकसान भरपाई मिळावी किंवा मोबदला मिळावा म्हणून सरकार दरबारी का ओरडत नाहीत?असा देखील सवाल त्यांनी केला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.