loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणाच्या जाण्याने आम्ही संपणार नाही , अडचणीत असताना ज्यांनी पळ काढला त्यांना आम्ही येत्या निवडणुकीत १००% पश्चात्ताप करायला लावणार हा आमचा शब्द आहे - दिग्विजय बागल

देवळाली येथील बागल गटासोबत शेवटपर्यंत निष्ठावंत राहिलेले माजी सभापती स्व कल्याणभाऊ गायकवाड यांचे चिरंजीव व देवळालीचे सरपंच तथा आदिनाथ चे संचालक अशिष गायकवाड यांनी बागल गटाला सोडचिठ्ठी देत आमदार संजयमामा शिंदे गटात सदस्य व कार्यकर्तेसमवेत नुकताच जाहीर प्रवेश केला आहे. गायकवाड यांचा प्रवेश बागल गटासाठी धक्का मानला जात आहे विट जिल्हापरिषद गट पंचायत समीती गणावर वर्चस्व मिळवण्यासाठी गायकवाड व देवळाली गावाची भुमीका महत्वाची होती ,मात्र ऐनवेळेस गायकवाड यांनी गट सोडल्याने दिग्विजय बागल यांच्याकडून "डॅमेज कंट्रोल" चा प्रयोग आत्ता सुरु झाला आहे .स्वतः दिग्विजय बागल यांनी देवळाली येथे जावुन स्व. दिंगबरराव बागल मामा यांच्या पासुन बागल गटासोबत असलेल्या कार्यकर्तेसमवेत बैठका घेतल्या आहेत. तसेच गायकवाड यांच्या या निर्णयावर नाराज असलेल्या कार्यकर्तेसमवेत देखील बागल यांनी संपर्क साधला असल्याचे बोलले जात आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अशिष गायकवाड यांच्या गटबदलावर दिग्विजय बागल यांनी थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी आज स्वतःच्या अधिकृत फेसबुकवर बैठकीच्या फोटोसह पोस्ट करुन गायकवाड यांच्यावर निषाणा साधला आहे .दिग्विजय बागल यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे की,

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

देवळाली गावातील काही ठराविक जण गट सोडून गेली आहेत. चार माणसं सोडून गेली म्हणून बागल गट मोडकळीस आला म्हणून समजणाऱ्यांनो बागल गट किती ताकदीचा आहे हे सोडून गेलेल्यांनाच विचारा. इथल्या मातीच्या प्रत्येक कणाकणात गटाने अस्तित्व निर्माण केले आहे. कुणाच्या जाण्याने आम्ही संपणार नाही तर अधिक ताकतीने आणि दहा पटीने वाढणार हा आमचा शब्द आहे. आज अडचणीत असताना ज्यांनी पळ काढला त्यांना आम्ही येत्या निवडणुकीत १००% पश्चात्ताप करायला लावणार हा आमचा शब्द आहे. बागल गटामध्ये अजूनही स्व. डिगामामांच्या विचारांची लोकं आहेत आणि नेहमी ती असणारच!!

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दिग्विजय बागल यांनी फेसबुकवर अक्रमक पोस्ट केल्याने कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात कशी समीकरणे घडतात या कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts