loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून वीट गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर - प्रवक्ते सुनिल तळेकर यांची माहिती

गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर - प्रवक्ते सुनिल तळेकर माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून वीट गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर झाल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की वीट गावासाठी आरोग्य केंद्र नसल्याने येथील नागरिक व रुग्णांना कोर्टी येथे जावे लागत होते. माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडे येथील ग्रामस्थांनी याबाबत मागणी केली होती त्यानुसार प्रस्ताव दाखल करुन याबाबत पाठपुरावा चालू ठेवला. या दरम्यान केडगाव ता करमाळा येथे आरौग्यकेंद्र मंजूर झाले परंतू त्या ठिकाणी पर्यायी जागा नसल्याने या प्राथमिक आरोग्यकेंद्राची मंजूरी रद्द होण्याच्या मार्गावर होती. परंतू माजी आमदार नारायण पाटील यांनी केडगाव व वीट या गावातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची एकत्रीत बैठक घेतली. या बैठकीसाठी जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जि प सदस्य बिभीषण आवटे, केडगाव मा सरपंच डाॅ कानगुडे आदिसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सर्वानूमते जागा उपलब्ध नसल्याने केडगाव ग्रामपंचायतीच्या ठरानूसार सदर प्राथमिक आरोग्यकेंद्र अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी संमती दिली गेली. यामुळे मंत्रालयीन पातळीवर माजी आमदार नारायण पाटील यांनी प्राथमिक आरोग्यकेंद्र स्थलांतर करणेसाठी आवश्यक कागदपत्रे राज्य शासनानाच्या आरोग्य विभागाकडे सादर केली व या कामासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे आग्रह धरला होता .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

अखेर या कामास यश मिळाले असून शासन निर्णय पारित झाला आहे. शासन निर्णय क्रमांक प्राआस्थ- 2021/ प्र. क्र. 217 / आरोग्य 3-अ या शासकीय निर्णयानुसार आता वीट गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर झाले असून लवकरच या कामाची निवीदा व पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. याकामासाठी करमाळा पंचायत समिती व सोलापुर जिल्हा परिषद यांनी सहकार्य केले. जि प लक्षमीबाई आवटे यांच्या कालावधीत सदर आरोग्य केंद्र लवकरात लवकर उभारले जाणार असून याबाबत पुढील पाठपुरावा सुरू आहे. वीट ग्रामस्थांच्या आरोग्य विषयक एका महत्वाच्या प्रश्नाची सोडवणूक केले बद्दल ग्रामस्थांनी माजी आमदार नारायण पाटील व जि प सदस्या सौ लक्षमीबाई आवटे यांचे आभार मानले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts