loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे स्वराज्य ध्वजाचे उत्स्फूर्त स्वागत

येथील विद्या विकास मंडळाचे , यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने स्वराज्य ध्वजाचे जंगी स्वागत करण्यात आले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात उंच 74 मीटर उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज खर्डा येथील शिवपट्टण या किल्ल्यावर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर फडकवण्यात येणार आहे. या ध्वज यात्रेचे करमाळा येथे महाविद्यालयासमोर आगमन झाल्यानंतर या ध्वजाचे पूजन एनसीसी कॅंडेट सुप्रिया पवार , वृषाली गटकुळ व साक्षी भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी आमदार रोहितदादा पवार यांचा सन्मान विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक, प्रबंधक कैलास देशमुख , एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख यांच्या हस्ते करण्यात आला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या स्वराज्य ध्वज यात्रेचे महाविद्यालयाच्या एनसीसी व एनएसएस स्वयंसेवकांच्या वतीने ढोल, ताशा, हलगी व फटाक्याच्या आतषबाजीने भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभ प्रसंगी कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष आमदार स्वतः भारावून गेले व त्यांनाही ढोल वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ढोल वाजवायला सुरुवात करताच तरुण वर्ग आनंदाने उल्हसित झाला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक वृंद एनसीसी व एनएसएस चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, सौ. संध्या बिले, सौ. सुरेखा जाधव , सौ. नीता माने, सौ. सुवर्णा कांबळे , सौ. अनिता अंधोरे , प्रा. आनंद शेळके, प्रा. महेश निकत यांनी परिश्रम घेतले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts