loader
Breaking News
Breaking News
Foto

बापरे ! कंटेनर मधुन जेसीबी मशीन भर रस्त्यावर पडले सुदैवाने जिवितहानी टळली रस्त्यावरील खड्डया मुळे घडला प्रकार!!

पोकलेन मशीन घेउन जाणारा कंटेनर खड्ड्यात आदळल्याने कंटेनर मधील पोकलेन भर रस्त्यावर आडवा पडला आहे सुदैवाने शेजारून एखादी चारचाकी किंवा दुचाकी जात नसल्याने मोठा गंभीर अनर्थ टळला आहे.हा प्रकार कविटगाव जवळ घडला असल्याची माहीती मिळत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत करमाळा चौफेर ने या बाबत वारंवार आवाज उठवला आहे तसेच प्रहार सह अन्य सामाजिक संघटनांनी देखील आंदोलनाचे इशारे दिले आहेत मात्र झोपेचे सोंग घेतलले प्रशासन मात्र कोणतीही दखल घेत नाही.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

हा रस्ता मृत्युचा सापळा म्हणून ओळखला जात आहे राष्ट्रीय महामार्गाकडे वर्गीकरण करून निधी उपलब्ध करण्या च्या नेतेमंडळीच्या वल्गना हवेतच विरगळुन जात आहेत.मात्र सर्व सामान्य जनतेला आपला जिव गमवावा लागत आहे . आणखी किती माणसं मेल्यावर हा रस्ता पुर्ण होणार आहे असा सवाल आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

जातेगाव टेंभुर्णी हायवे नंतर कोर्टी ते आवाटी हा रस्ता ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजना मुळे मृत्युचा सापळा बनला आहे अनेकांनी तक्रारी करून देखील आमदार, खासदार, बांधकाम विभागाचे अधिकारी ,तहसीलदार यांचे या कडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. प्रशासनाकडून कंपनीच्या नियमबाह्य कामाकडे दुर्लक्ष का केले जात आहे या बाबत नागरिकांकडून उलसुलट प्रश्न उपस्थित होत आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts