loader
Breaking News
Breaking News
Foto

दहा दिवसाच्या आत जातेगाव टेंभुर्णी रस्त्यावरील खड्डे न बुझवल्यास अधिकाऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा निघणार! प्रहारचा इशारा.

जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्यावर सध्या परतीच्या पावसाने नंतर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून अनेक अपघात या मुळे होत आहेत संबंधित अपघातात अनेक प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे गेल्या वर्षी लाखो करोडो रुपयांचा खर्च करून संबंधित रस्त्याची दुरुस्ती केली होती परंतु,भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाची दुरुस्ती करून अगदी सहा महिन्याच्या आत संबंधित रस्त्यावर पुन्हा तेवढेच खड्डे पडले असून पीडब्ल्यूडी संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालत आहेत.दहा दिवसाच्या आत खड्डे न बुझवल्यास संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खड्ड्यात पुरणार असल्याचा इशारा प्रहार चे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या आशयाचे निवेदन त्यांनी करमाळा पीडब्ल्यूडी शाखा तसेच करमाळा पोलीस स्टेशनला दिले आहे सदर निवेदन चार तारखेला दिले असुन प्रहार च्या मागणीला यश येणार का ,अधिकाऱ्यांची अंत्ययात्रा निघणार या कडे आता लक्ष लागले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी प्रहार संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर उपाध्यक्ष सोमनाथ जाधव करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार विकी मोरे पप्पू ढवळे पांगरे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील अमोल कोडलिंगे,सुनील जाधव गोविंदा विटकर ,सुनील जाधव,भारत माने,शहाजी डिकोले, शँकर डिकोले,अनेक प्रहार सैनिक उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवु शकला नाही

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts