loader
Breaking News
Breaking News
Foto

या वर्षी नवरात्र आठ दिवसांचे! जाणुन घ्या कारण व नऊ शुभ रंग!

आजपासून सुरु होणारा नवरात्र उत्सव यंदा आठ दिवसांचा असणार आहे. या वर्षी आश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्याने हा योगायोग आला आहे अशी माहिती जेष्ठ खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा .कृ .सोमन यांनी दिली आहे. आठ दिवसांचा नवरात्र असल्याने १४ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन होणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

नवरात्र उत्सव हा नऊ दिवसांचा का असतो ? याचे कारण म्हणजे नऊ हा अंक सर्व अंकामध्ये मोठा आहे नऊ हि ब्रह्मसंख्या समजली जाते .निर्मीतीशक्ती व नऊ अंक या मध्ये एक नाते आहे .धान्य जमीनीत पेरल्यानंतर नऊ दिवसांनी अंकुरते .गर्भधारणे नंतर नऊ महिने नऊ दिवसानंतर मुल जन्माला येते .नवरात्र हा निर्मितीशक्तीचा उत्सव असल्याने नऊ दिवसांचा असतो.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

नवरात्रील नवरंग पुढील प्रमाणे गुरवारी - पिवळा शुक्रवार- हिरवा शनिवार- राखाडी, रविवार-केशरी, सोमवार-पांढरा, मंगळवार-लाल, बुधवार-निळा , गुरुवार-गुलाबी,

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts