loader
Breaking News
Breaking News
Foto

मंगेश चिवटे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील काम कौतुकास्पद-आरोग्य मंत्री डॉक्टर राजेश टोपे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या माध्यमातून आत्तापर्यंत 22000 सर्जरी मोफत झाले असून कोरोना च्या काळात तर या वैद्यकीय मदत कक्षाने प्रशासनाच्या बरोबरीने काम करून सर्वसामान्याला मदत करण्याचे काम केली आहे याचे खरे श्रेय मंगेश चिवटे यांना जात असून त्यामुळेच आज त्यांना राज्य पातळीवरचा कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार दिला जात आहे असे मत राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी व्यासपीठावर संस्कृतिक व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख टीव्ही 9चे माजी संपादक तुळशीदास भोईटे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने उपस्थित होते .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी मंगेश चिवटे यांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अधिक बोलताना मंत्री राजेश टोपे म्हणाले की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ही मूळ संकल्पना मंगेश चिवटे यांची होती या संकल्पनेला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी गती देऊन सर्वसामान्यांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचे काम केले त्याच धर्तीवर मंगेश चिवटे यांनी राज्यपातळीवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे केरळ चा महापूर सातारा सांगली कोल्हापूर येथे आलेला महापूर नुकताच विदर्भ व मराठवाड्यात झालेला महापूर यानंतर झालेल्या साठीचे रोग नियंत्रणासाठी घेतलेल्या आरोग्य शिबिरातून जवळपास दीड लाख लोकांना प्राथमिक औषधे देण्यात आली कोरोना च्या काळात अनेक रुग्णांना मोफत इंजेक्शन्स देणे बेड उपलब्ध करून देणे ऑक्सिजन व रक्त उपलब्ध करून देणे ही कामे अहोरात्र या वैद्यकीय मदत कशाने केले या संपूर्ण टीमचा प्राथमिक स्वरूपात सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आवडते पत्रकार म्हणून मंगेश चिवटे आमच्या कुटुंबात ओळखले जात होते आजही त्यांच्या कामाचा आलेख बघून सर्वसामान्य रुग्णांना मदत बोलून द्यायची तळमळ बघून ते खरेच या पुरस्काराचे हक्कदार आहेत यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की हा सत्कार , हा गौरव माझा नसून सर्व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील स्वयंसेवकांचा आहे यापुढील काळात जेथे जेथे आरोग्याचे मदत लागेल येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत राहील असे स्पष्ट केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे पत्रकार नासीर कबीर उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts