loader
Breaking News
Breaking News
Foto

कंदर येथे शिक्षकांसाठी निंबध स्पर्धा संपन्न

सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी मा.दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून संपुर्ण जिल्ह्यात शिक्षकांसाठी निंबध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्या अनुषंगाने गटविकास आधिकारी मनोज राऊत व करमाळा गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली कंदर ता.करमाळा येथील कंदर केंद्रात शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा कण्वमुणी विद्यालय कंदर येथे उत्साहात संपन्न झाली. या निबंध स्पर्धेची सुरुवात म.गांधी यांंच्या प्रतिमेच्या पूजनाने केली. व म.गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी करमाळा तालूका गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग ,कंदर केंद्रप्रमुख साईनाथ देवकर व कंदर केंद्रातील सर्व सहभागी शिक्षक उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

स्वच्छ शाळा ,सुंदर शाळा हा मा.मुख्यकार्यकारी आधिकारी मा दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरु झाला. व जिल्ह्यातील हजारो शाळा कोरानाच्या काळातही स्वच्छ आणि सुंदर झाल्या. या यशस्वी उपक्रमात शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली.कोरोनाच्या कारणाने दुर्लक्षित झालेल्या विषयाकडे पुन्हा लक्ष देणे, व एकंदरीत गुणवत्ता वाढविणे पुन्हा आवश्यक आहे. यासाठी नवकल्पना शोधन्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यामध्ये शिक्षकांना ,"माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझी जबाबदारी" हा विषय देण्यात आला होता .यातून नवनवीन संकल्पना शोधून त्या उपयोग गुणवत्ता वाढीसाठी करण्यात आहे,या स्पर्धेसाठी कंदर केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्साहाने सहभागी झाले होते.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सखाराम राऊत,संतोष आंबेकर,श्रीहरी सुतार यांनी परिश्रम घेतले.यावेळी श्रीम.रोहिणी गायकवाड व श्रीम रत्नमाला होरणे यांनी असे नवनवीन उपक्रम राबवल्याबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब यांचे आभार मानले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मा.दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये कंदर केंद्रातील शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला,केंद्र प्रमुख साईनाथ देवकर यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते.या स्पर्धेतील यशस्वी शिक्षकांचा योग्य सन्मान केला जाणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts