loader
Breaking News
Breaking News
Foto

उजनी शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांनी केले ढोल ताशांच्या गजरात पाण्याचे पुजन

उजनी धरण शंभर टक्के भरले असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असून उजनी संघर्ष समीतीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात वांगी नं १ येथे उजनीच्या पाण्याचे पुजन करुन खणानारळानी ओटी भरली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावर्षी गत वर्षी पेक्षा धरण एक महिन्यापेक्षाही जास्त दिवसांनी संथ गतीने भरले . परतीच्या पावसाने तरी धरण भरते की नाही या चिंतेत उजनी जलाशय काठावरील लोक होते . परंतु संथगतीने का होईना पण धरण शंभर टक्के भरले . त्याचा आनंद उजनी धरणग्रस्तांनी ढोल ताशांच्या गजरात खणानारळानी ओठी भरून पूजन करून साजरा केला .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या प्रसंगी उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रा शिवाजी बंडगर, महेंद्र पाटील, आदिनाथ चे माजी संचालक भारत साळुंके, वांगी चे सरपंच विठ्ठल शेळके, युवा कार्यकर्ते सचिन देशमुख, तानाजी देशमुख, लोकविकास डेअरीचे दिपक आबा देशमुख, आबू तळेकर, वांगी सोसायटी चे माजी संचालक तुकाराम आप्पा देशमुख, वांगी चे उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे, सदस्य डाॅ भाऊसाहेब शेळके, गौतम नाना मोरे,ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख, विकास पाटील, तात्या मामा सरडे, संघर्ष शिल कार्यकर्ते अर्जुन आबा तकीक, शेतकरी संघटना प्रमुख हनु यादव, बंकट कदम ,दत्ता बापू देशमुख, सुधीर देशमुख, ॠषीकेष देशमुख, ढोकरी चे सरपंच किरण बोरकर ,उपसरपंच दत्ता खरात,तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब महानवर,जयराम सांगवे, महादेव नलवडे,ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ अजिनाथ देशमुख, वामन सरडे ,उदय देशमुख, सतिश शिंगटे,धीरज देशमुख , चांगदेव देशमुख उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उजनी भरल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts