loader
Breaking News
Breaking News
Foto

एन पी इन्फ्रा कन्स्ट्रक्शन च्या विरोधात जनहित याचीका दाखल करणार -- पंचायत समीती सदस्य दत्ता जाधव यांचा इशारा!

करमाळा चौफेर च्या वतिने एन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन विरोधात आवाज उठवल्यानंतर नागरिकांकडून या कंपनी विरोधात व प्रशासना विरोधात संताप उसळला आहे.पंचायत समीती सदस्य दत्ता जाधव यांनी या कंपनी विरोधात जनहित याचीका दाखल करण्याचा इशारा दिला या बाबत करमाळा चौफेर शी सविस्तर बोलताना म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 68 या कोर्टी ते आवाटी पर्यंत च्या रस्त्याचे दोनपदरीकरणाचे काम सुरु असुन सदर कामासाठी कंपनीस बेकायदेशीर रित्या वनविभाग क्षेत्रात खडी क्रशर व डांबरीकरण प्लॅन्ट मंजूरी दिली आहे तसेच साडे ते सौंदे, गुळसडी, शेलगाव या रस्त्यावरुन खडी व मुरुमाची ओव्हर लोड वाहतूक करुन सर्व रस्त्यांची वाट लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या विरोधात जिल्हा परिषद बांधकाम विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग यांच्याकडे अनेक तक्रारी दिल्या असुन संबंधित विभागने देखील या कंपनीला रस्ते दुरुस्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत तसेच ओव्हर लोड वाहतूक मुळे खराब झालेल्या रस्त्यावर अपघात झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे मात्र कंपनीचे मुजोर अधिकारी यांनी या आदेशास केराची टोपली दाखवली असुन मनमानी कारभार सुरु आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

धिम्या गतीने रस्त्याचे कामकाज सुरु असुन नियमानुसार काम होत नाही ,मुरुम व मातीने खड्डे बुजवून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. कंपनीच्या कामा विरोधात तसेच खडी क्रशर डांबरीकरण प्लॅन्ट च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचीका दाखल करणार असल्याचे साडे गणाचे पंचायत समीती सदस्य दत्ता जाधव यांनी करमाळा चौफेर शी बोलताना सांगीतले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या बाबत मुंबई येथील नामांकित कायदेतज्ज्ञ यांच्या सोबत सल्लामसलत चालु असल्याचे जाधव यांनी सांगीतले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts